जामखेड मधील एका शिक्षण संस्थेच्या गैरकारभाराविरोधात सामाजिक कार्यकर्ते संतोष गव्हाळे करणार उपोषण

0
1533

जामखेड न्युज—–

जामखेड मधील एका शिक्षण संस्थेच्या गैरकारभाराविरोधात सामाजिक कार्यकर्ते संतोष गव्हाळे करणार उपोषण

चेतना सेवा संस्था, लातूर यांच्या मार्फत साकत, तालुका जामखेड, जिल्हा अहिल्यानगर येथे सुरू असलेल्या नर्सिंग,फार्मसी व पॉलिटेक्निक महाविद्यालयांमध्ये फसवणूक, अपात्र कर्मचारी, बनावट कागदपत्रे यांद्वारे फसवणूक व गैरप्रकारांबाबत तपासणी करून कायदेशीर कारवाई करावी अन्यथा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते तसेच भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष संतोष गव्हाळे यांनी दिला आहे.

 

याच संस्थेविरोधात आज जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर येथे आरपीआय चे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे उपोषणाला बसले आहेत. आता परत याच संस्थेविरोधात सामाजिक कार्यकर्ते संतोष गव्हाळे यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे.

चेतना सेवा संस्था, लातूर यांच्या माध्यमातून साकत ता.जामखेड जि. अहिल्यानगर येथे खोट्या वबनावट कागदपत्रांच्या आधारे शासनाची फसवणूक करून खालील महाविद्यालयांना मंजुरी घेण्यात आली आहे.डॉ.पल्लवी एस.सूर्यवंशी कॉलेज ऑफ नर्सिंग (B.Sc) साकत ता.जामखेड जि. अहिल्यानगर – कॉलेज कोड: 9440
डॉ. पल्लवी एस. सूर्यवंशी कॉलेज ऑफ नर्सिंग (GNM) साकत ता.जामखेड जि. अहिल्यानगर – कॉलेज कोड: 1605
इंदिरा इन्स्टिट्यूट कॉलेज ऑफ फार्मसी साकत ता.जामखेड जि. अहिल्यानगर – कॉलेज कोड: 05656
इंदिरा पॉलिटेक्निक कॉलेज साकत ता.जामखेड जि. अहिल्यानगर कॉलेज कोड: 05656

वरील सर्व महाविद्यालयांसाठी एकच इमारत व तीच जमीन दाखवून, खोट्या व बनावट कागदपत्रांच्या आधारे तसेचकागदोपत्री शिक्षक व कर्मचारी दाखवून शासनाची फसवणूक करण्यात आलेली आहे. विविध तपासणी समित्यांना मोठ्या प्रमाणात लाच देऊन, अशा प्रकारे शिक्षण संस्थांना मंजुरी मिळवली गेली असून, विद्यार्थ्यांना केवळ कागदोपत्री प्रवेश देऊन त्यांच्या शिष्यवृत्त्या चा गैरवापर केला जात आहे. या महाविद्यालयांमध्ये प्रत्यक्षात कोणतेही शिक्षक वर्ग उपलब्ध नाहीत.

फक्त तपासणी दरम्यान कागदोपत्री कर्मचारी दाखवले जातात. अनेक अपात्र व्यक्तींना प्राचार्य म्हणून दाखवून बनावट दस्तऐवज सादर करण्यात आलेले आहेत. या प्रकारामुळे शासन,”विद्यापीठ तसेच विद्यार्थ्यांची मोठी फसवणूक होत असून शैक्षणिक दर्जाही गंभीरपणे प्रभावित झाला आहे.

त्यानुसार वर नमूद केलेल्या सर्व महाविद्यालयांची एकाच दिवशी संबंधित विद्यापीठामार्फत तात्काळ तपासणी करण्यातयावी व सर्व महाविद्यालयांची मान्यता व विद्यापीठाचे संलग्नीकरण तत्काळ रद्द करण्यात यावे. विद्यमान प्रवेशित विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन त्यांचे समायोजन इतर मान्यताप्राप्त महाविद्यालयांमध्येकरण्यात यावे.

डॉ. सुहास बिभीषण सूर्यवंशी, डॉ पल्लवी सुहास सूर्यवंशी तसेच चेतना सेवा संस्थेचे अन्य पदाधिकारी व कागदोपत्री काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यां विरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात यावेत. तपासणी व कारवाई पूर्ण होईपर्यंत जिल्हा प्रशासनाने इमारतीचा ताबा घेऊन महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश द्यावेत.

प्रबंधक, महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळ मुंबई व मा. उपसचिव, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षणमंडळ, प्रादेशिक कार्यालय,
छत्रपती संभाजीनगर व त्यांचे कार्यालयातील संबंधित अधिकारी व तपासणी चौकशी समिती सदस्य यांची खातेनिहाय चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी अन्यथा मा. जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांचे कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल याची नोंद घ्यावी.त्यानुसार विषयाचे गांभीर्य पाहता आपण तात्काळ कारवाईचे आदेश द्यावेत असे तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

निवेदन देतेवेळी संतोष गव्हाळे, सागर टकले, आकाश चंदन, युवराज डाडर, किरण खेत्रे, सागर लोखंडे, श्याम म्हेत्रे, अनिकेत खुराळे, केतन सदाफुले, ऋषी आजबे, पप्पू डाडर, विक्रांत डाडर, रोहित माने, रोहित हुलगुंडे, विशाल अंदुरे, मोनु खुराळे, अशोक होले, श्रीरंग माने, विकी, युवराज जमदाडे, रोहित नन्नवरे, रोहित सकट, बबलू जाधव, मुकुंद मेहत्रे, रवी शिरसागर, नितीन डाडर, रोहन माने, अल्ताफ शेख, आमिर शेख, अरबाज कुरेशी, प्रमोद गव्हाळे, अल्ताज सय्यद, मधुकर पवार (आदिवासी पारधी महासंघ जामखेड), मोहन चव्हाण, अमर घाईतडक, अमोल डाडर, सुरज लोंढे, आदी युवा कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here