आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सागर कोल्हे यांनी साकत गणातून जिल्हा परिषद निवडणुक लढवावी कार्यकर्त्यांचा आग्रह

0
346

जामखेड न्युज—–

आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सागर कोल्हे यांनी साकत गणातून जिल्हा परिषद निवडणुक लढवावी कार्यकर्त्यांचा आग्रह

राजुरीचे सरपंच व राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक कार्याध्यक्ष सागर कोल्हे यांचा आज वाढदिवस हा विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा होत आहे. आज साकत गणातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप करण्यात येणार आहे. गणातील कार्यकर्त्यांनी एकच मागणी लावून धरली आहे की, आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सागर कोल्हे यांनी साकत गणातून जिल्हा परिषद निवडणुक लढवावी अशी सर्व युवकांची इच्छा आहे.

राजुरी सरपंच व युवा उद्योजक गुरुदत्त अर्थमूव्हर्सचे संचालक मा सागर भाऊ कोल्हे अगदी गरीब परस्थीतून पुढे आलेला तरुण व्यवसायामध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करत राजुरी गावामधे ही आपली समाजसेवा करत स्वखर्चातून सार्वजनिक ठिकाणी बाकडे बसवणे तसेच सर्व गावात वाड्या वस्त्या वर lights चे पथ दिवे बसवले,

जिल्हा परिषद शाळामध्ये विविध उपक्रम घेत मुलांना शालेय साहित्य वाटप असेल तसेच शाळेतील मुलांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी प्रत्येक वर्षी भव्य दिव्य असा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करत आहेत, तसेच या कार्यामध्ये त्यांच्या पत्नी सौ अश्विनी ताई यांचाही मोठा वाट राहत असे तसेच गावामधे सर्व लोकांन सोबत घेऊन मिळून मिसळून काम करत आहेत.

तसेच या सामाजिक कार्यामध्ये काकासाहेब कोल्हे यांचाही लहान भाऊ म्हणून मोठा सहभाग राहत असे, गावातील कार्यकर्त्यांचा विश्वास कमावत 2022 ला झालेल्या ग्रामपंचात निवडणुकी मध्ये जनतेतून सरपंच होण्याचा बहुमान मिळवला.

जनतेच्या मनातील सरपंच म्हणून अश्विनी ताई निवडून आल्या, व जनतेतून सरपंच होण्याचा मान मिळाला, राष्टवादीचे युवक कार्यध्यक्षपद ही स्वीकारले व दादाच्या अगदी विश्वासू कार्यकर्ता म्हणून आपली ओळख निर्माण केली.

सरपंच झाल्यावर गावामधे विविध विकास कामाचा धडका लावत गावामधे भूमिगत गटार, सिमेंट रस्ते, पेव्हिग ब्लॉक, शेती मध्ये जाण्यासाठी पाणंद खडीकरण रस्ते असतील असे किती तरी कामे केले हे सर्व काम पाहून त्यांना बारामती येथे शारदा आदर्श सरपंच पुरस्कार ही मिळाला तसेच रोहित दादा व सुनंदा ताई पवार यांनी त्याचे खूप कौतुक केले, तसेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त साकत जिल्हा परिषद गटातील 5 हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात येणार आहे

चौकट,

कार्यसम्राट आमदार रोहित दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाने संधी दिल्यास साकत जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवावी अशी मागणी होत आहे. तेव्हा जर संधी मिळाली तर नक्कीच दादांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लढवू असे सागर कोल्हे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here