संतोष खाडे यांच्या विशेष पथकाची श्रीगोंदा नंतर कर्जत तालुक्यात गटख्यावर मोठी कारवाई, तीन आरोपी जेरबंद जामखेड मध्ये चोरी चोरी चुपके चुपके गुटखा विक्री सुरूच

0
1143

जामखेड न्युज—–

संतोष खाडे यांच्या विशेष पथकाची श्रीगोंदा नंतर कर्जत तालुक्यात गटख्यावर मोठी कारवाई, तीन आरोपी जेरबंद

जामखेड मध्ये चोरी चोरी चुपके चुपके गुटखा विक्री सुरूच

परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अवैध धंदे विरोधात धडक मोहीम उघडली असून संपूर्ण जिल्ह्यात धाडसत्र सुरू केले आहे. यात गुटखा, मटका, अवैध दारू तसेच अवैध वाळू उपसा करणारे यांच्या वर कारवाई चा बडगा सुरू केला आहे. जिल्ह्यातील पथक तालुकावार जाऊन कारवाई करत आहे तर तालुक्यातील पोलीसांच्या कामगिरीवर शंका उपस्थित होत आहे. अनेक ठिकाणी सध्या राजरोस ऐवजी चोरून लपून मटका सुरू आहे तसेच गुटखा विक्री सुरू आहे. किंमती मात्र वाढवल्या आहेत. यावर कारवाई होणे आवश्यक आहे.

सोमनाथ घार्गे साहेब, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी विशेष पथक तयार करुन अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांविरुद्ध कारवाई करणे बाबत आदेश दिलेले आहेत.
वरील नमुद आदेशाप्रमाणे मा. परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्री. संतोष आ. खाडे हे
दि.०५/०७/२०२५ रोजी कर्जत पोलीस स्टेशन हद्दीत विशेष पोलीस पथकासह पेट्रोलींग करुन अवैध धंद्यांची माहिती घेत असताना त्यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, कर्जत पोलीस स्टेशन हद्दीमध्ये राशिन ते भिगवण जाणारे रोडवर, भिगवणकडून एक पांढरे रंगाची मारुती सुझुकी कंपनीची इको या वाहनामध्ये काही इसम हे महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेला व शरिरास अपायकारक होईल असा खाद्य पदार्थ पान मसाला, गुटखा वाहतूक करणार आहेत.

अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने तात्काळ कर्जत पोलीस स्टेशनचा स्टाफ व पंचांना समक्ष बोलावून हकिगत समजावून सांगून छापा टाकण्यासाठी हजर रहा असे कळवून त्यांनी संमती दिल्यानंतर पोलीस पथक पंचर्चासह कारवाई करण्यासाठी लागणाऱ्या साहित्यासह शासकीय व खाजगी वाहनाने रवाना झाले. 

वरील नमूद ठिकाणी जाऊन सापळा लाऊन थांबले असताना, थोड्याच वेळात राशिन ते भिगवण जाणारे रोडवर पाण्याच्या टाकी जवळ भिगवणकडून राशिन कडे एक पांढरे रंगाची मारुती सुझुकी कंपनीची इको गाडी येताना दिसली ती जवळ येताच पोलीस पथकाने इशारा करून सदर गाडी रस्त्याच्या कडेला थांबून चातमीतील नमूद माहिती प्रमाणे सदरची गाडी इको स्टार गाडी क्र. MH-४२-BE-२८३२ ही असल्याची खात्री झाल्याने पंचासमक्ष सदर गाडीवरील चालकास ताब्यात घेऊन पोलीस पथक असल्याची माहिती देऊन गाडीतील इसमांना विश्वासात घेवून त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव १) संभाजी शिवाजी सरक वय-३५ वर्षे रा. मदनवाडी भिगवण ता. इंदापूर जि.पुणे (चालक) २) अमर अनिल कांबळे वय-३५ वर्ष रा. आंबेडकर नगर, राशिन ता. कर्जत जि. अहिल्यानगर ३) भाऊसाहेब किसन सकुंडे यय-२७ वर्षे रा. मदनवाडी, भिगवण ता. इंदापूर जि.पुणे असे असल्याचे सांगितले. पंचासमक्ष सदर गाडीची झडती घेतली असता गाडीमध्ये अवैध गुटख्याच्या पांढऱ्या गोण्या व बॉक्स मिळून आले.

सदर गाडीमधील माल हा अमर अनिल कांबळे व भाऊसाहेब किसन सकुंडे यांच्या मालकीचा आहे. गाडीमध्ये एकूण १,५४,८८५/- रुपये किंमतीची सुगंधी तंबाखू, गुटखा पानमसाला तसेच ४,००,०००/- रु. किंमतीची मारुती सुझुकी कंपनीची इको स्टार गाडी क्र. MH-४२-BE-२८३२ असा एकूण ५,५४,८८५ /- रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने कर्जत पोलीस स्टेशन पोलीस स्टाफ यांनी पंचासमक्ष प्रतिबंधीत अन्न पदार्थाच्या साठ्यामधून प्रत्येकी एक कंपनी सीलबंद पॅकेट प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठविणे कामी वेगवेगळे केले व बाकीचा मिळून आलेला मुद्देमाल सविस्तर पंचनामा करुन जप्त करुन वरील आरोपींविरुध्द कर्जत पोलीस स्टेशनला खालीलप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

१) कर्जत पोलीस स्टेशन गु.र.नं. ३९४/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम १२३,२२३,२७४,२७५,३ (५) प्रमाणे
वरील प्रमाणे कर्जत पोलीस स्टेशन हद्दीत महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेली व शरीरास अपायकारक होईल असे खाद्यपदार्थ, सुगंधीत तंबाखू, गुटखा पानमसाला विक्रीसाठी वाहतूक करणारे ०३ आरोपींविरुध्द कारवाई करुन एकूण ५,५४,८८५ रु. किंमतीचा मुद्देमाल त्यामध्ये १,५४,८८५/-रु. किंमतीची सुगंधी तंबाखू, गुटखा पानमसाला तसेच ४,००,०००/- रुपये किंमतीचे ०१ चारचाकी वाहन असा मुद्देमाल मिळून आल्याने वरील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी श्री. सोमनाथ घार्गे सो. पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, श्री. प्रशांत खैरे सो, अपर पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, श्री. वैभव कलुवमें सो, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपुर विभाग अहिल्यानगर, श्री. सुनिल पाटील सो, उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत यांचे मार्गदर्शनाखाली, पोलीस अधीक्षक सो यांचे विशेष पथकाचे प्रभारी मा.परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्री. संतोष खाडे यांच्यासह पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here