प्रा. सचिन गायवळ यांच्या तर्फे आषाढी एकादशी निमित्ताने धाकटी पंढरीसाठी मोफत बससेवा सहा लक्झरी बस सेवा उपलब्ध, सेवेचे तिसरे वर्ष

0
308

जामखेड न्युज—–

प्रा. सचिन गायवळ यांच्या तर्फे आषाढी एकादशी निमित्ताने धाकटी पंढरीसाठी मोफत बससेवा

सहा लक्झरी बस सेवा उपलब्ध, सेवेचे तिसरे वर्ष

गेली तीन वर्षापासून प्रा. सचिन गायवळ यांनी धाकटी पंढरी धनेगाव येथे जाण्यासाठी खर्डा ते धनेगाव व नान्नज ते धनेगाव या परिसरातील भाविक भक्तांसाठी गेली तीन वर्षापासून मोफत बस सेवा सुरू केली आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन गायवळ सर यांनी केले आहे.

प्रत्येक भक्तगणांना पंढरपूर येथे विठ्ठल आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाता येत नाही अशा भावीक भक्त व महिला लहान मुले यांची गैरसोय होऊ नये म्हणून गेली तीन वर्षापासून प्रा.सचिन गायवळ यांनी खर्डा, सातेफळ, वंजारवाडी सोनेगाव, धनेगाव तसेच नान्नज जवळका, व धनेगाव येथील धाकटी पंढरी म्हणून समजल्या जाणाऱ्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी मोफत बस सेवा गेली तीन वर्षापासून सुरू केली आहे.

धनेगाव येथील विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर हे जागृत देवस्थान म्हणून समजले जाते. परंतु अनेक भाविकांना पंढरपूरच्या दर्शनासाठी गर्दीमुळे जाता येत नाही, त्यामुळे पंढरपूर नंतर विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीला धाकटी पंढरी समजले जाते.त्यामुळे जामखेड तालुक्यासह मराठवाड्यातील अनेक गावातील महिला व भावीक भक्त येथे दर्शनासाठी आषाढी यात्रेच्या निमित्ताने उपवास धरून दर्शनासाठी येत असतात.

परंतु एस.टी. महामंडळाच्या बस या खर्डा व नान्नज या ठिकाणीच येत असतात त्यानंतरचा 15 किलोमीटरचा प्रवास भाविकांना खाजगी वाहन मोटरसायकल किंवा पायी चालत जावून करावा लागत होता.

या बाबत प्रा.सचिन गायवळ यांनी याचे गंभीर्य ओळखून गेली तीन वर्षापासून नान्नज या गावातून येथील परिसरातील लोकांसाठी दोन लक्झरी बस सेवा व खर्डा येथील बस स्थानकापासून धाकटी पंढरी असणाऱ्या धनेगाव येथील विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी चार अशा एकूण सहा लक्झरी बस सेवा भाविक भक्तांसाठी सुरू केल्या आहेत.

गेली अनेक वर्षापासून सचिन सर गायवळ हे गणपती उत्सव, नवरात्र उत्सव, दुष्काळात पिण्याच्या पाण्याचे टँकर अडचणीत असलेल्या रुग्णांना आरोग्य सेवा, समाज सेवा करीत असताना अडचणीत असलेल्या कार्यकर्त्यांना मदत करणे तसेच इतर शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी ते सतत प्रयत्न करीत असतात.

याबाबत दि. 6 जुलै 2025 रोजी आषाढी एकादशीच्या निमित्ताने नान्नज व खर्डा बस स्थानका समोर सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते या बससेवेचा शुभारंभ करण्यात येणार आहे, तरी जास्तीत जास्त भावीक भक्तांनी व सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी बससेवेचा लाभ घ्यावा अशी विनंती प्रा.सचिन सर गायवळ मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

त्यामुळे वयस्कर पुरुष, महिला लहान मुले त्यांना या मोफत बस सेवेमुळे भाविकांना दर्शन घेण्यासाठी मोठा लाभ झाला असल्याचे भाविक भक्तांकडून कडून बोलले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here