जामखेड तालुक्यात सात जुगाऱ्यांवर कारवाई, लाखो रूपयांचा मुद्देमाल हस्तगत
जामखेड तालुक्यातील सावरगांव शिवारात शिऊर रस्त्यावर गुप्त माहितीनुसार गुरूवार दि. ३ रोजी स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर व जामखेड पोलीस यांनी छापा टाकून सात जुगाऱ्यांना ताब्यात घेत सुमारे 2,85,500 रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या सात जणांवर महाराष्ट्र जुगारबंदी कायदा कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सावरगांव शिऊर रस्त्यावर हॉटेल रानमळा चे पाठीमागे पत्र्याचे शेडमध्ये सात जण मुद्देमालासह पत्याच्या सहाय्याने तिरट नावाचा हारजितीचा पैशावर जुगार खेळताना मिळुन आले यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या ठिकाणी रोख रक्कम, मोबाईल हँड सेट मोटारसायकल असा एकुण 2,85,500 रूपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे.
1) अशोक बाबासाहेब चिंचकर, वय 33 वर्षे रा. हुनमान वस्ती सावरगाव ता.जामखेड जि.अहिल्यानगर,
दि. 03/07/2025 रोजी 11/50 वा. चे सुमारास सावरगाव गावचे शिवारात, सावरगाव ते शिऊर जाणारे रोड लगत, हॉटेल रानमळा चे पाठीमागे पत्र्याचे शेडमध्ये ता जामखेड येथे मुद्देमालासह पत्याच्या सहाय्याने तिरट नावाचा हारजितीचा पैशावर जुगार खेळताना मिळुन आले यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सात जुगाऱ्यांसह तालुक्यातील सुमारे पाच ठिकाणी अवैध दारू विक्री हाॅटेल वर कारवाई करण्यात आली आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल बी.पी. पालवे करत आहेत.