ग्रामपंचायत सदस्य व त्यांच्या मुलाचा विजेच्या ताराला चिटकून मृत्यू, जामखेड तालुक्यातील घटना महावितरणच्या गलथान कारभारामुळे बापलेकाचा मृत्यू

0
871

जामखेड न्युज—–

ग्रामपंचायत सदस्य व त्यांच्या मुलाचा विजेच्या ताराला चिटकून मृत्यू, जामखेड तालुक्यातील घटना

महावितरणच्या गलथान कारभारामुळे बापलेकाचा मृत्यू

जामखेड तालुक्यातील खर्डा परिसरातील शिकारे वस्ती बाळगव्हाण येथील ग्रामपंचायत सदस्य काकासाहेब दौलत शिकारे (वय 42 ) व त्यांचा मुलगा महेश काकासाहेब शिकारे (वय 15 वर्षे) हे दोघे बापलेक शेतामध्ये खते टाकण्यासाठी गेले असता त्यांचा तुटलेल्या वीज प्रवाहशी संपर्क झाला यातच दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे यामुळे खर्डा परिसरात शोककळा पसरली आहे. पंधरा दिवसांपुर्वी झालेल्या वादळात तुटलेल्या तारा तशाच राहिल्याने वीज मंडळाच्या गलथान कारभारामुळे बापलेक जीवाला मुकले असे ग्रामस्थांनी सांगितले

याबाबत समजकेली माहिती अशी की, जामखेड तालुक्यातील शिकारे वस्ती येथील बाळगव्हाण ग्रामपंचायतचे सदस्य काकासाहेब दौलत शिकारे वय 42 व त्यांचा मुलगा महेश काकासाहेब शिकारे वय 15 वर्षे शेतामध्ये खते टाकण्यासाठी गेले असता त्यांचा तुटलेल्या वीज प्रवाहशी संपर्क झाला असता या दोघांचा दुर्दैव मृत्यू झाला. त्यामुळे परिसरावर भयंकर शोककळा पसरली आहे,

ही घटना सोमवारी संध्याकाळी अंदाजे पाचच्या आसपास घडली असावी असा अंदाज आहे. संध्याकाळी हे बापलेक घरी परतले नाहीत म्हणून कुटुंबाने व काही ग्रामस्थांनी शोधा शोध केली असता त्यांचा शेतामध्ये मृतदेह विजेच्या तुटलेल्या तारे जवळ दिसून आला.

पंधरा ते वीस दिवसापूर्वी वादळी वाऱ्याने वीज मंडळाच्या खांबावरील ताबा तुटल्या होत्या, याबाबत येथील नागरिकांनी वीज प्रवाह तुटला असल्याचे अधिकाऱ्यांना सांगितले होते. परंतु त्यांनी तारा जोडून वीज प्रवाह सुरळीत करण्यासाठी दुर्लक्ष केल्याचे दिसून आले आहे. असे शिकारे वस्ती व बाळगव्हाण ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

त्यांच्या दुर्लक्षामुळे या बाप लेकाचा बळी गेल्याचा त्यांच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे. याबाबत जबाबदार वीज मंडळाच्या अधिकाऱ्यावर चौकशी करून मृत्यूस कारणीभूत असल्याचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी ग्रामस्थ व शेतकरी वर्गामध्ये व्यक्त केली जात आहे.

या घटनेची माहिती समजली असता खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत यांनी घटनास्थळाला भेट देऊन पुढील कारवाई करून तपास सुरू केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here