Friday, February 13, 2026
Home ताज्या बातम्या श्री क्षेत्र सौताडा येथे भव्य श्रीराम मंदिराचे बांधकाम होणार! परमपूज्य पांडू...

श्री क्षेत्र सौताडा येथे भव्य श्रीराम मंदिराचे बांधकाम होणार! परमपूज्य पांडू देवा यांच्या शुभहस्ते भूमिपूजन संपन्न

0
1409

जामखेड न्युज—–

श्री क्षेत्र सौताडा येथे भव्य श्रीराम मंदिराचे बांधकाम होणार!

परमपूज्य पांडू देवा यांच्या शुभहस्ते भूमिपूजन संपन्न

 

बीड जिल्ह्यात तीन पाटोदा तालुक्याच्या श्रीक्षेत्र स्वतःला येथे श्रीराम मंदिराचे भव्य बांधकाम होणार असून आज या अनुषंगाने श्रीराम मंदिराच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा परमपूज्य पांडू देवा यांच्या हस्ते संपन्न झाला.

श्रीक्षेत्र सौताडा हे बीड अहिल्यानगर राज्य रस्त्यावर पाटोदा पासून दहा किलोमीटर अंतरावर आहे धार्मिक स्थळ म्हणून या गावाचा नावलौकिक आहे तीर्थक्षेत्र ठिकाणी श्रीराम मंदिर उभारणीचे काम सुरू होणार असल्याने भक्तांमध्ये आनंद आहे.

सुमारे दोन कोटी रुपये खर्च अपेक्षित असून त्या अनुषंगाने या बांधकामाची निर्मिती होणार आहे नांदेड येथील कारागीर यांच्याकडे हे काम देण्यात आले असून हे मंदिर दगडी काम बांधकामांमध्ये होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

ज्या पद्धतीने ज्ञानेश्वर माऊलींचे मंदिर भगवानगड येथे होत आहे त्याच पद्धतीने पूर्ण दगडाचे श्रीरामचंद्र यांचे मंदिर होणार आहे परमपूज्य पांडू देवा शास्त्री सौताडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे मंदिराचे काम सुरू होणार आहे.

सौताडा ग्रामस्थांच्या माध्यमातून तन मनधनाने या कामाची पूर्ती होणार आहे आज मंदिराचे भूमिपूजन होऊन कामाला सुरुवात करण्यात आली आहे.

परमपूज्य पांडू देवा यांच्या हस्ते आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये नारळ फोडून आज कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली गावकरी मोठ्या आनंदाने आणि भक्ती भावाने श्रमदान करीत आहेत. यावेळी सौताडा घुलेवाडी भुरेवाडी येथील ग्रामस्थ उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!