जामखेड शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव, लहान मुलांवर जीवघेणे हल्ले जामखेड शहरात घाणीचे साम्राज्य, मोकाट कुत्रे, जनावरे, रस्त्यावर चिखल व दलदल यामुळे डेंग्यू मलेरिया रूग्णांची वाढ, नगरपरिषदेचे दुर्लक्ष

0
283

जामखेड न्युज—–

जामखेड शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव, लहान मुलांवर जीवघेणे हल्ले

जामखेड शहरात घाणीचे साम्राज्य, मोकाट कुत्रे, जनावरे, रस्त्यावर चिखल व दलदल यामुळे डेंग्यू मलेरिया रूग्णांची वाढ, नगरपरिषदेचे दुर्लक्ष

जामखेड शहरात सगळीकडे मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य पसरले असून, मोकाट कुत्रे, जनावरे व डुक्करांचा मुक्त संचार रस्त्यावर आहे. यामुळे डासांची संख्या वाढली असून डेंग्यू मलेरिया साथीची आजार वाढले आहेत. शहरातील रस्त्यावर सगळीकडे चिखल व दलदल आहे. जामखेड नगरपरिषद म्हणजे असून अडचण व नसून खोळंबा आशी अवस्था निर्माण झाली आहे. लहान मुलांना कुत्र्याने चावा घेतल्याने अनेक मुले गंभीर जखमी झाले आहेत. काही मुलांना तर नगरला हलवावे लागले आहे. ताबडतोब मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

दोन दिवसांपूर्वी जामखेड शहरातील वर्धमान सोसायटी येथील पाच वर्षाच्या मुलीला कुत्र्याने भयंकर जावा घेतल्याने गंभीर जखमी झाली होती. घटनेची माहिती समजतात सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज शिंदे यांच्याशी संपर्क साधून प्राथमिक उपचार करून मुलीस रॅबिस इंजेक्शन कँट तीन देण्यासाठी ताबडतोब नगरला पाठवले आहे सध्या जामखेड शहरांमध्ये रोज तीन चार लोकांना कुत्रे चावा घेत आहेत. कुत्र्याचे टोळके अचानक येतात आणि लहान मुले खेळत असतील त्या ठिकाणी जाऊन त्यातील मुलांवर कुत्रे हल्ले करतात.

वर्धमान सोसायटी येथील पाच वर्षाच्या मुलीला दहा ते बारा ठिकाणी चावा घेतल्याने गंभीर जखमी व रक्तबंबाळ झाली होती. ताबडतोब जामखेड येथे ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचार घेऊन लहान मुलीला नगरला सिव्हिल हॉस्पिटल मध्ये हलवण्यात आले. भटके कुत्रे, मोकाट जनावरे, डुक्करांचा उपद्रव यामुळे जामखेड कर हैराण झाले आहेत. ताबडतोब मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

जामखेड शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला आहे. गल्लोगल्ली ही संख्या वाढत असून, नागरिकांना त्यांचा उपद्रव सहन करावा लागत आहे. ही कुत्री अंगावर येत असल्याने लहान मुले व वयोवृद्धांना शहरातून वावरताना दक्षता घ्यावी लागते. मोटारसायकलस्वारांच्या मागे कुत्री लागत असल्याने मोटारसायकल चालविताना कसरत करावी लागत आहे. नगरपरिषदेने या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत. कुत्रे, डुकरे यांच्या उपद्रवाबरोबरच घाणीच्या साम्राज्य मुळे डासांचा उपद्रव वाढला आहे यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

जामखेड सौताडा महामार्गाचे काम खुपच संथ गतीने सुरू आहे. काही ठिकाणी सिंगल पट्टी तर काही ठिकाणी अर्धवट रस्ते आहेत यामुळे वाहतूक कोंडी होते यातच रस्त्यावर कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी फिरतात. मोकाट जनावरे ही रस्त्यावर मधोमध बसलेले असतात. एखाद्या नागरिकांने त्यांना हाकलण्याचा प्रयत्न केला तर ते अंगावर धावून येतात. कुत्रे तर मोटारसायकल मागे लागल्याने अनेक मोटारसायकल स्वार घसरून पडून जखमी झाले आहेत.

सध्या शहरात कुत्र्यांच्या झुंडी मोकाट जनावरे, डुक्करांचा मुक्त संचार नेहमीचाच झाला आहे. कधी कधी तर पंधरा ते वीस कुत्र्याच्या झुंडी च्या झुंडी रस्त्यावर फिरत आहेत. ही कुत्री बीड रोड, नगर रोड, तपनेश्वर, सदाफुले वस्ती, पेठ, पोलीस स्टेशन तसेच बाजारपेठ, बसस्थानक परिसरात वावरत असून, यामुळे नागरिकांना व ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो.

कुत्र्यांना हाकलायचा प्रयत्न केल्यास ती अंगावर येत आहेत. या कुत्र्यांमुळे वयोवृद्ध व लहान बालके यांना रस्त्यावरून ये-जा करणे धोक्याचे बनले आहे. कधीही कुत्री अंगावर येण्याची शक्यता नाकरता येत नाही. शहरातील काही शेतकऱ्यांच्या शेळ्यांचा चावाही या कुत्र्यांनी घेतल्याचे नागरिक सांगतात.

अनेक वेळा मोटारसायकलला कुत्री आडवे आल्याने अनेक जण पडून जखमी झाले आहेत. अनेकांच्या पायाला व हाताला दुखापत झाली. त्यामुळे या कुत्र्यांचा नगरपरिषदेने बंदोबस्त करावा, अशी मागणी शहरातील नागरिक करीत आहेत.

चौकट
सध्या जामखेड परिसरात दररोज तीन चार पेशंट कुत्रा चावलेले येतात किरकोळ असेल तर आपल्या कडे कँट एक, कँट दोन प्रकारचे ढोस आहेत परंतु पेशंट जर गंभीर असेल तर कँट तीन प्रकारच्या पेशंट साठी जखमेत इंजेक्शन घ्यावे लागते ते फक्त नगर सिव्हिल हॉस्पिटलमध्येच मिळते असे चार पाच पेशंट महिन्यात नगरला पाठवावे लागतात.

वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज शिंदे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here