जामखेड न्युज——–
पंचायत समिती, जिल्हा परिषद व नगरपरिषद निवडणूकीत घवघवीत यश मिळवून सभापती प्रा. राम शिंदे यांचा विश्वास सार्थ ठरविणार
भाजपाचे ग्रामीण मंडलाध्यक्ष बापुराव ढवळे व शहर मंडलाध्यक्ष संजय काशिद यांना विश्वास
जामखेड भाजपाच्या ग्रामीण मंडलाध्यक्ष पदी बापुराव ढवळे तर शहर मंडल अध्यक्षपदी संजय काशिद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दोघेही विधानपरिषदेचे सभापती प्रा राम शिंदे यांचे विश्वासू समजले जातात. या अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली जामखेड नगरपरिषद व पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका होणार आहेत.
या निवडणुकीत घवघवीत यश मिळवत सभापती प्रा राम शिंदे यांचा विश्वास सार्थ ठरवू असे जामखेड ग्रामीण मंडलाध्यक्ष बापुराव ढवळे व शहरमंडलाध्यक्ष संजय काशिद यांनी जामखेड न्युजशी बोलताना सांगितले.
जामखेड भाजपाच्या ग्रामीण मंडलाध्यक्ष पदी विधानसभेचे सभापती प्रा राम शिंदे यांचे विश्वासू सहकारी तसेच पिंपरखेड येथील हॅट्रिक सरपंच बापुराव ढवळे व शहर मंडलाध्यक्ष पदी संजय काशिद यांची निवड करण्यात आली आहे. येणाऱ्या निवडणुकीत दोन्ही अध्यक्ष आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवून घवघवीत यश संपादन करतील अशीच चर्चा सध्या सगळीकडे आहे. आम्ही शिंदे साहेबांचा विश्वास निवडणूकीत विजय संपादन करून मिळवू असे ढवळे व काशिद यांनी सांगितले.
जामखेड तालुका ग्रामीण मंडलाध्यक्ष बापुराव ढवळे
तालुकाध्यक्ष बापुराव ढवळे हे सभापती प्रा राम शिंदे यांचे विश्वासू आहेत तसेच ते पिंपरखेड ग्रामपंचायत चे सलग तीन वेळा सरपंच राहिलेले आहेत. तरुणांमध्ये मोठा चाहतावर्ग त्यांचा आहे. येणाऱ्या ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत मित्र पक्षांना बरोबर घेत घवघवीत यश संपादन करू असे सांगितले.
शहर मंडलाध्यक्ष संजय काशिद