कर्जबाजारीपणातून स्वतः च्या पोटच्या गोळ्यासह संपूर्ण कुटुंबाला संपवलंय
बायको आणि दोन वर्षांच्या मुलाची हत्या करून 30 वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. धाराशिव तालुक्यातील बावी येथे ही घटना घडली आहे. लक्ष्मण मारुती जाधव असे या आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. ऑनलाईन रम्मी गेममध्ये मोठ्या प्रमाणावर पैसे गमावल्याने तो कर्जबाजारी झाला होता.
पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मण आणि तेजस्विनी यांचा तीन वर्षापूर्वी प्रेमविवाह झाला होता. दोघांना शिवांश नावाचा दोन वर्षांचा मुलगा होता. जाधव यांचा सुखी संसार सुरु होता. मात्र दरम्यान लक्ष्मण जाधव ऑनलाईन गेम रम्मी खेळत असे. याशिवाय त्याने शेअर बाजारातही पैसे गुंतवले होते.
धाराशिव जिल्ह्यातील बावी या गावातील लक्ष्मण जाधव नामक ट्रॅक्टर चालकाने बायको अन् मुलाला आधी संपवले अन् नंतर स्वतःचा जीव घेतला असल्याची शक्यता आहे. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार मयत ट्रॅक्टर चालकास ऑनलाइन रम्मी खेळण्याचा नाद लागला होता.
यामुळेच त्याची आर्थिक परिस्थिती बिकट झाली अन् त्यांनी नैराश्यातून आधी कुटुंबाला नंतर स्वतःला संपवून घेतले.
त्यामुळे कोणीही ऑनलाइन रम्मी सारख्या जुगाराच्या नादी लागू नये.. सुखाची अन् कष्टाची भाकर आयुष्यभर पुरते मात्र जुगार, सट्टा, मटका अन् गुटखा आपला व आपल्या कुटुंबाचा अंत खूप वाईट करून टाकतो.
घटनेची माहिती मिळताच धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मारुती शेळके घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आले आहेत. अंतिम कारण पोस्टमार्टेम अहवालानंतर स्पष्ट होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.