साकत गणातून पंचायत समिती उमेदवारी साठी भाजपाने मोहा ग्रामपंचायतचा विचार करावा मोहा ग्रामपंचायतचे प्रत्येक निवडणुकीत भाजपला मताधिक्य

0
1022

जामखेड न्युज—–

साकत गणातून पंचायत समिती उमेदवारी साठी भाजपाने मोहा ग्रामपंचायतचा विचार करावा

मोहा ग्रामपंचायतचे प्रत्येक निवडणुकीत भाजपला मताधिक्य

प्रत्येक निवडणुकीत मोहा ग्रामस्थांनी भाजपला मताधिक्य दिले आहे. आता पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. तेव्हा भाजपाने साकत गणातून सरपंच भीमराव कापसे किंवा ग्रामपंचायत सदस्य विकास सांगळे या दोन्ही नावांपैकी एका नावाचा विचार करून उमेदवारी द्यावी अशी एकमुखी मागणी मोहा ग्रामस्थांनी केली आहे.

राज्यात बऱ्याच काळानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक रणधुमाळी सुरू होणार आहे, तशीच इच्छुक उमेदवाराची गर्दी वाढताना पाहायला मिळत आहे.जामखेड तालुक्यातील साकत गणातूनही अनेक उमेदवार इच्छुक असल्याचे पाहायला मिळत आहे. मोहा ग्रामपंचायत 2009 पासून महामहीम सभापती प्राध्यापक राम शिंदे साहेब यांना लीड देत आली आहे.

आम्ही सर्व ग्रामस्थ नेहमीच प्राध्यापक राम शिंदे साहेबांचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहोत,त्यामुळे किमान यावर्षी तरी मोहा ग्रामस्थांना न्याय देण्यात यावा. अशी मागणी इच्छुक उमेदवार व विद्यमान ग्रामपंचायत सरपंच भिमराव कापसे आणि ग्रामपंचायत सदस्य विकास सांगळे यांच्यासह मोहा ग्रामस्थ यांची आहे. म्हणून आदरणीय शिंदे साहेबांनी यांनी जाणीवपूर्वक विचार करावा.

सभापती प्रा. राम शिंदे यांच्या माध्यमातून परिसरातील रस्ते, वीज, पिण्याचे पाणी हा प्रश्न मार्गी लागलेले आहेत. मोहा परिसर हा भाजपाचा बालेकिल्ला आहे. यामुळे साकत गणातून उमेदवारी साठी विचार व्हावा अशी मागणी होत आहे.

सरपंच भीमराव कापसे किंवा ग्रामपंचायत सदस्य विकास सांगळे या दोघांपैकी कोणाही एक जणाला उमेदवारी मिळाल्यास संपूर्ण परिसर एकमुखी त्यांच्या पाठिशी राहणार आहेत. यामुळे पंचायत समिती उमेदवारी द्यावी

नेहमीच भाजपाला मताधिक्य देणाऱ्या व
आजपर्यंत तालुका पातळीवरील कोणत्याही निवडणुकीत मोहा गावाला संधी मिळाली नाही त्यामुळे आता संधी मिळावी अशी मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here