जामखेड शहर गोळीबाराच्या घटनेने हादरले,एक जण गंभीर जखमी
लघवी करण्याच्या कारणावरून जामखेड शहरात रात्री दहा साडेदहा च्या सुमारास आरोपीस राग आल्याने त्यांनी फिर्यादीस शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन जीवे ठार मारण्याचा उद्देशाने पिस्टर मधुन गोळ्या मारुन साक्षीदार यास गंभीर जखमी केले आहे. जखमीस अहिल्यानगर येथे दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे जामखेड शहर हादरले आहे.
रविवारी सायंकाळी दहा वाजता फिर्यादीचे अदित्य बबन पोकळे ( वय 20 ) वर्षे धंदा वॉशिंग सेंटर रा. पोकळेवस्ती, जामखेड ता. जामखेड जि. अहिल्यानगर हे विंचरणा नदीचे नविन पुलावर आपल्या दुकानासमोर असताना तीघे जण एक चारचाकी सिल्व्हर कलरची किया सेल्टोस गाडी उभी करून दुकानासमोर लघवी (लघुशंका) करत होते. त्यांना सांगितले इथे लघवी करू नका जवळ महिला आहेत याचा राग मनात धरून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन जीवे ठार मारण्याचा उद्देशाने पिस्टर मधुन गोळ्या मारल्या तीन राउंड फायर केले यात कुणाल बंडू पवार वय 20 वर्षे जखमी झाले सध्या प्रकृती स्थिर आहे. जखमी हे दवाखान्यात ऍडमिट असल्याने प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांची फिर्याद घेण्यात आलेली आहे.
घटनेची माहिती मिळताच जामखेड पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले फिर्यादी च्या सांगण्यारून तीन अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल करुन गु.र.नं.व कलम जामखेड पो. स्टे गु.र.नं.293/2025 भा.न्या सं 2023 चे कलम 109,115(2), 352,3(5) सह आर्म अँक्ट कलम 3,25 प्रमाणे (पिस्टल मधुन फायर करुन जिवे मारण्याचा प्रयत्न) दाखल करण्यात आले आहे.
पोलीस निरीक्षक महेश पाटील हे घटनेचा तपास करत असून लवकरच आरोपीस अटक करण्यात येईल असे सांगितले.
गोळीबाराच्या घटनेने जामखेड शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटले आहे की,
मतदारसंघातील आणि एकूणच राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत मी कायम आवाज उठवत आहे. गुन्हेगारांना कायद्याचा आणि पोलिसांचा धाक उरलेला नाही. जामखेडमध्ये रात्री सव्वा दहाच्या सुमारास एका हॉटेल व्यावसायिकाच्या मुलावर गोळीबार झाला असून यात तो गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी अहिल्यानगरला हलवण्यात आलं. अशा घटनेमुळे शहराच्या शांततेला गालबोट लागत असून नागरिकांना जीव मुठीत घेऊन दहशतीत रहावं लागत आहे. सामान्य माणसाला मोकळा श्वास घेता यावा यासाठी सरकारने या गुंडगिरीला चिरडून टाकावं, ही विनंती!