जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने अहिल्यादेवींच्या भक्तांना मोफत नाष्टा व फळे वाटप

0
387

जामखेड न्युज—–

जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने अहिल्यादेवींच्या भक्तांना मोफत नाष्टा व फळे वाटप

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त चौंडी येथे भव्य दिव्य जयंती उत्सव साजरा करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व अनेक मंत्रीगण होते. या कार्यक्रमासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून भक्त गण चौंडी येथे येतात. सामाजिक बांधिलकीतून जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने या भक्तांना मोफत नाष्टा फळे पाणी वाटप करण्यात आले. या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

जामखेड तालुका म्हणजे मराठवाड्याचे प्रवेशद्वार समजले जाते. संपूर्ण मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणात भाविक भक्त जामखेड मार्गी येतात या भाविक भक्तांना जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने मोफत नाष्टा फळे पाणी वाटप करण्यात आले.

यावेळी सभापती पै. शरद कार्ले संचालक डॉ. गणेश जगताप, वैजिनाथ पाटील, विष्णु भोंडवे, डॉ सिताराम ससाने, रवींद्र हुलगुंडे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने जामखेड करमाळा रस्त्यावर जामखेड जवळ आयटीआय समोर या मार्गाने चौंडीला जाणाऱ्या भक्तांसाठी नाष्टा फळे व पाणी वाटप करण्यात आले होते.

मोठ्या प्रमाणात भाविक भक्तांनी या नाष्टा फळे वाटपाचे कौतुक करत आस्वाद घेतला. चौंडी येथील विकास आराखड्यासाठी सरकारने 681 कोटींच्या खर्चास मंजुरी दिली आहे. यातील साडेतीनशे कोटींचे रस्त्यांनी चौंडीला जोडणार आहे. यामुळे येत्या तीन वर्षांत चौंडी आंतरराष्ट्रीय दर्जाचे तीर्थक्षेत्र होणार आहे.

विधानपरिषदेचे सभापती प्रा राम शिंदे यांच्या माध्यमातून महिन्याभरापूर्वी चौंडी येथे मंत्रिमंडळ बैठक घेऊन विकास आराखड्यासाठी सरकारने 681 कोटींच्या आराखडा तयार केला होता. यास नुकतीच मंजुरी मिळाली आहे. तसेच आणखी पाचशे कोटी रुपये चौंडी विकास आराखड्यासाठी सभापती शिंदे यांनी मागणी केली आहे. तीन वर्षांत चौंडी आंतरराष्ट्रीय दर्जाचे तीर्थक्षेत्र होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here