सकारात्मकतेमुळेच भोस यांनी पोलीस खात्यात यशस्वी सेवा केली – पोलीस निरीक्षक महेश पाटील सहायक फौजदार शिवाजी भोस सेवापुर्ती समारंभ उत्साहात संपन्न

0
753

जामखेड न्युज—–

सकारात्मकतेमुळेच भोस यांनी पोलीस खात्यात यशस्वी सेवा केली – पोलीस निरीक्षक महेश पाटील

सहायक फौजदार शिवाजी भोस सेवापुर्ती समारंभ उत्साहात संपन्न

पोलीस खात्यात काम करणे खुप खडतर काम आहे. ते एक काचेचे भांडे आहे. अनेक वेळा माणसे अंतरावर घ्यावी लागतात. असे असतानाही या खात्यात ३५ वर्षे यशस्वी सेवा करणे सोपी गोष्ट नाही ती सहायक फौजदार शिवाजी भोस यांनी केलेली आहे. हेच खरे यश आहे असे मत पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी सेवापुर्ती समारंभ कार्यक्रमात केले.

जामखेड पाटील स्टेशनचे सहायक फौजदार शिवाजी भोस सेवापुर्ती समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष पोलीस निरीक्षक महेश पाटील होते तर प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी शुभम जाधव, सौ. जाधव मॅडम, पाटील मॅडम, एपीआय विजय झंजाड, नंदकुमार सोनवळकर, साकतचे माजी सरपंच कांतीलाल वराट, महादेव वराट, सुभाष पाटील, भाऊसाहेब इथापे, महादेव साळुंके यांच्या सह पोलीस, पत्रकार, शिक्षक व व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना महेश पाटील म्हणाले की, भोस यांचा सर्वात चांगला गुण म्हणजे कधीही फोन केला तरी उचलणार कोणतेही काम सांगितले तरी होय म्हणणार कधीही कामाला नकार दिला नाही अगदी आज सेवेच्या शेवटच्या दिवशी पण त्यांनी चौंडी येथे आपले कर्तव्य बजावून थेट सेवापुर्ती समारंभासाठी हजर झाले आहेत. यापुढेही भोस यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे असे पाटील यांनी सांगितले.

यावेळी बोलताना गटविकास अधिकारी शुभम जाधव यांनी सांगितले की, वर्दीतील नोकरीत खुप आव्हाने असतात सुट्टी नसते, रजा मिळत नाहीत. अशाही परिस्थितीत भोस यांनी आपले काम लिलया सांभाळले हेच खरे यश आहे.

यावेळी बोलताना एपीआय विजय झंजाड म्हणाले की, पोलीसांना कुटुंबाकडे लक्ष देता येत नाही. तरी घरच्या महिलांनी कुटुंबांकडे लक्ष द्यावे पाल्यांची जबाबदारी स्वीकारावी असे आवाहन केले.


यावेळी पोलीस काँ. दिनेश गंगे, संजय लोखंडे, देशमाने, सहायक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवळकर, एपीआय वर्षा जाधव, पत्रकार सुदाम वराट, एनसीसी विभागाचे मयूर भोसले यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी बोलताना सत्कारमुर्ती सहाय्यक फौजदार शिवाजी भोस म्हणाले की, गेले ३५ वर्षे मी निष्ठेने संयमाने काम केले, जामखेड पोलीस स्टेशनने मला खुप सहकार्य केले यामुळेच मी चांगली सेवा करू शकलो.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत कुभांर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here