Thursday, February 12, 2026
Home शैक्षणिक बातम्या अवकाळी मुसळधार पावसामुळे शिक्षक अभियोग्यता परीक्षा धारकांना फटका नद्यांना पुर, वाहतूक...

अवकाळी मुसळधार पावसामुळे शिक्षक अभियोग्यता परीक्षा धारकांना फटका नद्यांना पुर, वाहतूक कोंडी मुळे परीक्षा केंद्रावर जाण्यास विलंब, पुन्हा परीक्षेला संधी मिळावी

0
381

जामखेड न्युज—–

अवकाळी मुसळधार पावसामुळे शिक्षक अभियोग्यता परीक्षा धारकांना फटका

नद्यांना पुर, वाहतूक कोंडी मुळे परीक्षा केंद्रावर जाण्यास विलंब, पुन्हा परीक्षेला संधी मिळावी

शिक्षक अभियोग्यता परीक्षा सुरू आहे परीक्षा केंद्र पुणे, संभाजीनगर, मुंबई, नागपूर, नाशिक
अशा मोठ मोठ्या शहरात २७ मे पासून ५ जून पर्यंत परीक्षा आहे. दोन दिवसांपूर्वी राज्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मुसळधार पाऊस झाला नद्यांना पुर आला होता. तसेच वाहतूक कोंडी झाली होती यामुळे परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी उशीर झाला परीक्षा केंद्रात प्रवेश मिळाला नाही यामुळे अनेकांची परीक्षा बुडाली अभ्यास करूनही परीक्षा देता आली नाही. यामुळे अनेक विद्यार्थी नाराज झाले होते. त्यांनी शिक्षण मंत्र्यांला निवेदन देऊन आम्हाला परीक्षा देण्याची संधी मिळावी अशी विनंती करण्यात आली आहे.

मागील काही दिवसात सतत पाऊस सुरू होता अनेक ठिकाणी नद्या, ओढे यांना पुर आला होता. यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. पुर ओसरल्यावर अनेक वाहने सुटली यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. याचा परिणाम अनेक परीक्षार्थींना परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी उशीर झाला. पाच मिनिटे उशीर झाला तरी गेट बंद केले जाते परत प्रवेश नाही दोनशे अडिचशे किलोमीटर प्रवास करून नैसर्गिक आपत्ती मुळे पाच मिनिटे उशीर झाला तरीही काही उपयोग झाला नाही. यामुळे संतप्त झालेल्या अनेक परीक्षार्थींनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे तसेच शिक्षणमंत्री यांना पुन्हा परीक्षा घेण्याची विनंती केली आहे.


शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य दादासाहेब जी भुसे (शालेय शिक्षण कॅबिनेट मंत्री) यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, आकांक्षा रामदास घोडेस्वार TAIT 2025 परीक्षेसाठी नोंदणीकृत उमेदवार आहे. माझी परीक्षा दिनांक 27 मे 2025 रोजी सकाळी 9.00 वाजता नियोजित होती.

मात्र, त्या दिवशी झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि वाहतूक कोंडीमुळे, मला वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचता आले नाही. माझ्याकडून सर्वतोपरी प्रयत्न करूनही, परीक्षेची वेळ निश्चित असल्याने मला परीक्षा केंद्रात प्रवेश मिळाला नाही आणि त्यामुळे माझी परीक्षा चुकली.

मी ही परीक्षा मन लावून आणि प्रामाणिकपणे तयारी केली होती. माझ्या शिक्षकी कारकीर्दीसाठी ही परीक्षा खूप महत्त्वाची आहे.

आपल्या परीक्षेच्या नियमांचा मी पूर्णतः सन्मान करते. तरीही माझी विनंती आहे की मला या परीक्षेसाठी पुनर्परीक्षेची एक संधी द्यावी.
आपला सकारात्मक विचार अपेक्षित आहे.


मी शेख जबीन अन्वर .माझा TAIT २०२५ चा पेपर दि. 27.05.25 रोजी ION Digital zone राम टेकडी सेंटर येथे सकाळी पहिल्याच batch मध्ये होता.मी मुळची अहमदनगर जिल्ह्यातील आहे. २७.०५.२०२५ रोजी अहमदनगर व पुणे जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने महामार्गावर खूप ट्रफिक होते.खूप प्रयत्न करूनही मला १ मिनिट उशीर झाला.मी सेन्टरच्या व्यवस्थापकांना खूप वेळा विनंती केली.माझ्यासारखे ट्रेफिकमुळे उशिर झालेले 6-7 परीक्षार्थी होते.आम्ही खूप वेळा विनंतीही केली.काही मुले तर शेवगाव ,राहाता ,श्रीरामपूर असे जवळ जवळ १५०-२०० किमी प्रवास करून आले होते. अहमदनगर जिल्हा विस्ताराने एवढा मोठा असूनही जिल्ह्यात परीक्षेचे एकही सेंटर उपलब्ध नाही.

मी या परीक्षेची मन लावून आणि प्रामाणिकपणे तयारी केली आहे.माझ्या शिक्षकी कारकीर्दीसाठी आम्ही परीक्षार्थींना पुनर्परीक्षा देण्यासाठी संधी मिळावी ही नम्र विनंती

अशा प्रकारे शेख अन्वर, सुनील अनाप, विद्या ठुबे, संजय भंडारे यांच्या सह अनेक जणांना वाहतूक कोंडी व पुर स्थिती यामुळे परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी उशीर झाला यामुळे परीक्षा बुडाली अभ्यास करूनही विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे पुन्हा परीक्षेची संधी मिळावी अशी विनंती करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!