जामखेड न्युज – – –
अधिकाधिक गावे कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी, यासाठी राज्य सरकारने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून आपापल्या गावात यासाठीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांबबतची कडक अंमलबजावणी करावी, असे आवाहन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कोरोनामुक्त गावांच्या सरपंच, ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत सदस्यांशी डॉ. गोऱ्हे यांनी जिल्हा परिषदेत संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हे आवाहन केले. तत्पूर्वी त्यांनी ग्रामीण भागातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, उपाध्यक्ष रणजित शिवतरे, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पंचायत समित्यांचे सभापती, गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच उपस्थित होते.
कोरोनामुक्तीसाठीच्या सरकारी योजनांची अंमलबजावणी करताना त्यात गावकऱ्यांना सहभागी करून घेणे, हीच यशाची पहिली पायरी ठरते आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर गावांनी आतापासूनच खबरदारी घ्यावी, यानुसार मास्क लावणे, वारंवार हात धुणे, गर्दीत जाणे टाळणे आणि दोन व्यक्तींमध्ये पुरेसे अंतर राखणे, या नियमांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. जेव्हा गावेच्या गावे बाधित होऊ लागतात, तेव्हा गावपातळीवर गृह विलगीकरणाच्या व्यवस्था फसतात. याच कारणाने दुसऱ्या लाटेमध्ये गृहविलगीकरण कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.कोरोना सद्यःस्थितीचा घेतला आढावा दरम्यान, जिल्ह्यातील कोरोना आढावा बैठकीत त्यांनी कोरोनाची सद्यःस्थिती, ग्रामीण भागातील लसीकरण, हॉटस्पॉट भागातील धडक मोहिमेतील तपासण्या, एकूण बाधित रुग्ण, तपासण्यांचे प्रमाण, मागील तीन महिन्यांतील वयोगटानुसार मृत्युदर, सर्वात जास्त क्रियाशील रुग्ण, हॉटस्पॉट ग्रामपंचायती, कार्यान्वित झालेले ऑक्सिजन प्लँट, म्युकरमायकोसिसची ग्रामीण भागातील स्थिती, कोविड लसीकरण केंद्र आणि लससाठा आदींचा आढावा घेतला.