जामखेडमध्ये गटाराचे पाणी घरात, नगरपरिषदेविरोधात सामुदायिक आत्मदहनाचा इशारा

0
487

जामखेड न्युज—–

जामखेडमध्ये गटाराचे पाणी घरात, नगरपरिषदेविरोधात सामुदायिक आत्मदहनाचा इशारा

जामखेडमध्ये तपनेश्वर भागात दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे गणेश कोकणे यांच्या घरात गटाराचे पाणी शिरले यामुळे घरात दुर्गंधी पसरली होती. नगरपरिषदेने योग्य कार्यवाही न केल्यास सामुदायिक आत्मदहनाची परवानगी द्यावी अशी मागणी नगरपरिषदेला दिलेल्या निवेदनात गणेश कोकणे यांनी केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, मी जामखेड शहरातील वार्ड क्रमांक ०६ मध्ये गेल्या ३० ते ३५ वर्षापासून वास्तव्यास आहे. सदरील भागात नगर परिषदेकडून कोणत्याही प्रकारच्या मुलभूत सुविधा पुरविण्यात आलेल्या नाहीत जसे की, रस्ता, गटार, पाणी, लाईट इ.काल दि.२०/०५/२०२५ रोजी झालेल्या पावसाच्या पाण्याचा निचरा न झाल्याने सदरील गटारीचे पाणी व पावसाचे पाणी घरात आल्यामुळे सर्व संसार पाण्यात भिजलेला आहे.

सदरील पाण्यात जीव-जंतू असल्याने घरातील वृद्ध व लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम होवू शकतो हा त्रास आम्हाला मागील ८-१० वर्षापासून होत असून मी स्वतः खूप वेळा नगरपरिषदेस विनंती अर्ज व स्वतः भेटून विनंती केलेली आहे परंतू त्याची कोणीही दखल घेतलेली नाही.

तेव्हा पुन्हा विनंती करण्यात येते की, माझी समस्या आपण सोडवावी अन्यथा सहकुटूंब नगरपरिषदे समोर आत्मदहन करण्याची परवानगी द्यावी.कृपया माझ्या अडचणीचा सहानभुतीपूर्वक विचार व्हावा अन्यथा मला टोकाचे पाऊल उचलावेलागेल याची नोंद घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे.

जामखेड नगरपरिषद म्हणजे असून अडचण नसून खोळंबा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी थोडा पाऊस झाला की रस्त्यावर तळे साचते, रस्त्यावर सर्वत्र चिखल, दलदल आहे. यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते.

अनेक वर्षांपासून नगरपरिषदेला प्रशासक आहे. प्रभागातील समस्या कडे लक्ष देण्यासाठी अधिकारी यांना वेळ नाही यामुळे नागरिकांना अनेक अडचणी ला सामोरे जावे लागत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here