राज्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका; पाहा कुणाची कुठे बदली?
सोमनाथ घार्गे अहिल्यानगर चे नवीन पोलीस अधीक्षक
सोमनाथ घार्गे नवीन पोलीस अधिक्षक अहिल्यानगर तर राकेश ओला यांची उपआयुक्त मुंबई या ठिकाणी बदली झाली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर होण्याआधीच राज्यातील बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरु झाला आहे. राज्यात आठ वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या.
त्यानंतर गुरुवारी २१ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस प्रशासनाच्या निर्णयाने राज्यातील अनेक जिल्ह्यांना नवीन पोलीस अधीक्षक मिळाले आहेत.
राज्यातील 21 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या राज्यातील अनेक जिल्ह्यांना मिळाले नवीन पोलीस अधीक्षक
कोकण विभागातील रत्नागिरी तसेच मराठवाड्यातील धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांना सुद्धा नवीन पोलीस अधीक्षक
सोमनाथ घार्गे अहिल्यानगर चे नवीन पोलीस अधीक्षक
आंचल दलाल रायगडच्या नवीन पोलिस अधीक्षक
साताऱ्याच्या पोलिस अधीक्षक पदावर तुषार दोशी यांची नियुक्ती
नितीन बगाते रत्नागिरीचे तर रितू खोकर या धाराशिव चे पोलिस अधीक्षक
अर्चित चांडक यांच्याकडे अकोल्याचे पोलिस अधीक्षक तर योगेश कुमार गुप्ता हे कोल्हापूरच्या पोलिस अधीक्षक पदी नियुक्त