जामखेडच्या रोहित थोरातची आंतरराष्ट्रीय वुशु स्पर्धेसाठी निवड
वुशु असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने नुकतीच डेहराडून येथे आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड चाचणी घेण्यात आली. या निवड चाचणी मधून जामखेड चा राष्ट्रीय खेळाडू रोहित थोरात याची 1 ते 7 जून दरम्यान मॉस्को,रशिया येथे होणाऱ्या मॉस्को आंतरराष्ट्रीय वुशु स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
निवड झाल्याचे पत्र वुशु असोसिएशन ऑफ इंडिया चे अध्यक्ष जितेंद्र सिंग भाजवा यांनी दिले आहे. रोहित थोरात यांनी यापूर्वी राज्यस्तरीय वुशु स्पर्धेमध्ये 1 सुवर्ण, 2 रौप्य व 1 कांस्यपदक प्राप्त केले आहे. आंतरमहाविद्यालयीन वुशु स्पर्धेमध्ये 4 सुवर्णपदक, चार वेळा राष्ट्रीय वुशु स्पर्धेमध्ये सहभाग व एक ऑल इंडिया वुशु स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आहे.
आणि मागील वर्षी भारत सरकारच्या वतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये रोहित थोरात या खेळाडूंनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे रोहित थोरात हा खेळाडू 13 वर्षापासून आंतरराष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक लक्ष्मण उदमले व श्याम पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन मराठी शाळा जामखेड येथे सराव करत आहे.
रोहित थोरात याची घरची परिस्थिती हालाखीची असून आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी मदतीचे आवाहन करण्यात आले आहे यासाठीखाते नंबर – 36323497769 IFSC :- SBIN0000537 खातेदार नाव – रोहित शिवाजी थोरात
तसेच गुगल पे नंबर – 7350338487 रोहित शिवाजी थोरात तरी दानशूर व्यक्तींनी सढळ हाताने गुणी आंतरराष्ट्रीय खेळाडू साठी मदत करावी असे आवाहन करण्यात आले आहे.