जामखेड मध्ये पहिल्याच पावसाने हाहाकार शहरातील अनेक घरात पाणी, तालुक्यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

0
494

जामखेड न्युज—–

जामखेड मध्ये पहिल्याच पावसाने हाहाकार

शहरातील अनेक घरात पाणी, तालुक्यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

परिसरात काही दिवसांपासून अवकाळीचा तडाखा जाणून लागला आहे. काल सायंकाळी झालेल्या पावसाने शहरासह तालुक्यात एकच हाहाकार उडाला. शहरातील अनेक ठिकाणी नागरिकांच्या घरात पाणी शिरले तसेच तालुक्यातील अनेक ठिकाणी फळबागा सह कांदा, आंबा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

शहरात काल झालेल्या पावसामुळे नगरपरिषदेचा ढिसाळ कारभार समोर आला आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर तळे साचलेले होते. तर अनेक ठिकाणी घरात पाणी शिरले, लाईट गेली यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली घरातील वस्तू भिजल्या घरातील पाणी बाहेर काढावे लागले, गणेश कोकणे यांच्या घरात तर मोठ्या प्रमाणावर पाणी शिरले होते. गटाराचे पाणी घरात शिरल्याने दुर्गंधी पसरली होती. कोकणे यांनी अनेक वेळा नगरपरिषदेला निवेदन देऊन समस्या सोडवण्याची मागणी केली होती. पण समस्या सुटली नाही आज पुन्हा आज नगरपरिषदेला निवेदन देऊन लवकरात लवकर समस्या न सुटल्यास कुटुंबासह सामुदायिक आत्मदहन करण्याची नगरपरिषदेने परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे.

जामखेड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. पावसाने फक्त शेतीच नाही तर फळबागांनाही मोठा फटका दिला असून प्रशासनाने ताबडतोब पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे. जामखेड शहरासह जवळा, हळगाव, पिंपरखेड, साकत, फक्राबाद आणि मतेवाडी भागात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. विशेषतः लिंबोणीच्या बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.


कांदा उत्पादक शेतकऱ्यांनाही या पावसामुळे दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. ओलसर हवामानामुळे कांद्याच्या साठवणुकीवर व त्याच्या गुणवत्तेवर गंभीर परिणाम झाला आहे. कांदा सडण्याचा धोका वाढल्यामुळे आधीच बाजारात कमी भाव यामुळे नुकसान दुपटीने झाले आहे.


वादळी वाऱ्यामुळे अनेक गावांमध्ये वीज पुरवठा खंडित झाला असून नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर गंभीर परिणाम झाला आहे. चोंडी गावात एका घराची भिंत कोसळली, पण कोणतीही जीवितहानी झाली नाही. प्रशासनाकडे शेतकरी आणि स्थानिक नागरिक तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी करत आहेत.

जामखेड तालुक्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. या आपत्तीत त्यांना सरकारी मदत मिळणे आवश्यक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here