Wednesday, February 11, 2026
Home शैक्षणिक बातम्या ल.ना. होशिंग विद्यालयाची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम, दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

ल.ना. होशिंग विद्यालयाची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम, दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

0
805

जामखेड न्युज—–

ल.ना. होशिंग विद्यालयाची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम, दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

शहरातील दि.पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे ल.ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, इयत्ता दहावीचा निकाल अत्यंत गौरवास्पद ठरला आहे. विद्यालयाचा एकूण निकाल ९५.८३% लागला असून, ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त करणारे ११ विद्यार्थी आहेत. तसेच, ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ९९ इतकी आहे.

प्रथम क्रमांक कु. खंडागळे श्रेयशी महेश – ४७५ गुण ९५.००% ,
द्वितीय क्रमांक कु. म्हेत्रे गौरी अनिल -४७४ गुण,९४.८०%,
द्वितीय क्रमांक,कु. वायफळकर पायल मच्छिंद्र – ४७४ गुण,९४.८०%,
तृतीय क्रमांक चि. टेकाळे ओंकार शाहुराव- ४६५ गुण,९३.००%, पटकावला आहे.

या यशाबद्दल तसेच विद्यालयाच्या या यशामागे प्राचार्य बाळासाहेब पारखे, उपप्राचार्य सादिक शेख, उपमुख्याध्यापक प्रविण गायकवाड, पर्यवेक्षक दत्तात्रय राजमाने,शिक्षकवृंद, पालक आणि विद्यार्थ्यांचे अथक परिश्रम कारणीभूत आहेत.

निकालाच्या निमित्ताने संस्थेचे अध्यक्ष उद्धवराव देशमुख, उपाध्यक्ष अरुण चिंतामणी, सचिव शशिकांत देशमुख, सहसचिव दिलीप गुगळे, खजिनदार राजेश मोरे, संचालक सैफुल्ला खान, संचालिका नलिनी कुलकर्णी, संचलिका संगिता देशमुख व सन्माननीय सदस्य मंडळाकडून व संपूर्ण तालुक्यातून विद्यालयाचे अभिनंदन होत आहे.

चौकट
बारावीचा निकालही नेहमीप्रमाणे यंदाही निकालाची उत्कृष्ट होता.
अनेक विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.
१०० पैकी १०० गुण मिळविणारे ल.ना.होशिंग विद्यालयाचे विद्यार्थी आहेत. या मध्ये चि.चव्हाण पार्थ शिवाजी,शेतीशास्त्र १०० गुण,कुमारी डमरे समिक्षा कैलास ,शेतीशास्त्र ,१०० गुण,कुमारी धांडे प्रांजली सोमिनाथ,पुस्तकपालन व लेखाकर्म‌,१०० गुण प्राप्त झाले आहेत.

ल.ना.होशिंग विद्यालयाच्या इयत्ता दहावी आणि बारावीचा निकालाचे संपूर्ण तालुक्यात कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!