भारतीय संरक्षण दलाला बळ मिळावे म्हणून शिवसेना युवासेना उपप्रमुख नितीन कोल्हे यांचे तुळजाभवानी चरणी साकडे

0
489

जामखेड न्युज—–

भारतीय संरक्षण दलाला बळ मिळावे म्हणून शिवसेना युवासेना उपप्रमुख नितीन कोल्हे यांचे तुळजाभवानी चरणी साकडे

भारत व पाकिस्तानमध्ये सध्या निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभुमीवर जामखेड येथील शिवसेना तालुका युवक उपप्रमुख नितीन कोल्हे यांच्या सह युवकानी शनिवारी सकाळी तुळजापुर येथे जाऊन आई तुळजाभवानीचे दर्शन घेत देशाच्या तीनही संरक्षण दलांना बळ मिळावे यासाठी साकडे
घातले.


भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युध्दाच्या पार्श्वभुमीवर शिव सेनेच्या वतीने कोल्हे यांनी आई तुळजाभवानीला विशेष प्रार्थना करून आई जगदंबे सर्व सैनिकांना बळ देवो आणि आपल्या सर्व तीनही दलाच्या जवानांना बळ मिळावे यासाठी संपूर्ण युवकांच्या वतीने आई जगदंबे मातेला साकडे घातले आहे.

देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या सर्व भारतीय सैन्यदलासाठी प्रार्थना केली. शहीद जवानांना त्यांनी यावेळी भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली.

यावेळी कोल्हे म्हणाले की, दोन्ही देशांमधील ही परिस्थती लवकरच सुधारेल. पाकिस्तानी दहशतवाद्यांनी निष्पाप भारतीय पर्यटकांवर गोळया झाडून त्यांचे बळी घेतले. त्याचा बदला भारतीय लष्कराने दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ला करून घेतला आहे.

भारतीय सैन्याने पाकिस्तानी लष्कर अथवा तेथील नागरिकांवर हल्ला केलेला नाही. असे असतानाही पाकिस्तानकडून कांगावा करण्यात येत आहे हे दुर्देव आहे.

निष्पाप पर्यटकांचे बळी घेणाऱ्या
दहशतवाद्यांना लष्कराने चोख उत्तर देत
आपली क्षमता सिध्द केली आहे. अवघ्या २३ मिनिटांमध्ये आपल्या लष्कराने दहशतवाद्यांचे
तळ उद्ध्वस्त केले हीच भारतीय सैन्य दलाचे वेगळेपण असून त्याचा सर्व भारतीयांना अभिमान असल्याचे सांगतानाच आई तुळजाभवानी मातेच्या कृपेने देशात शांतता नांदो आणि सर्व भारतीय नागरीक सुरक्षित राहोत अशी सदिच्छाही शिव सेना युवा तालुका उपप्रमुख यांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी, शिवसेनेचे युवा तालुका उपप्रमुख नितीन कोल्हे, जवळा येथील युवा उद्योजक इंजिनीयर प्रवीण मेहर साहेब, युवा नेते अमोल रोडे, युवानेते रमेश हजारे, दिपक हजारे, माजी ग्रामपंचायत सदस्य अनिल हजारे यांच्या सह युवा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here