जामखेड न्युज ——
जामखेड महाविद्यालयाच्या यशात प्राचार्य डोंगरे यांचे योगदान महत्त्वाचे – शशिकांत देशमुख
प्राचार्य डॉ एम एल डोंगरे यांचा सेवापुर्ती सोहळा संपन्न
जामखेड महाविद्यालयास चांगली आर्थिक शिस्त लावली तसेच महाविद्यालयाचा गुणात्मक दर्जा उंचावण्यात प्राचार्य डोंगरे यांचे योगदान मोठे आहे. आपल्या संपूर्ण नोकरी काळात कधी कोणाशीही संघर्ष न करता सर्वांशी सौजन्यपुर्ण राहून काम करून घेतले. यामुळे जामखेड महाविद्यालयाच्या यशात प्राचार्य डोंगरे यांचे योगदान महत्त्वाचे आहे असे मत संस्थेचे सचिव शशिकांत देशमुख यांनी व्यक्त केले.
जामखेड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम एल डोंगरे सेवापुर्ती समारंभ संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उद्धवबापू देशमुख, प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्ष अरूणशेठ चिंतामणी, सचिव शशिकांत देशमुख, खजिनदार राजेश मोरे, संचालक सैफुल्ला खान, डिप्लोमा कॉलेजचे प्राचार्य विकी घायतडक,
शिवाजीराव ढाळे, ल. ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य बी. ए. पारखे, श्री भैरवनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक रमेश अडसूळ, श्री साकेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक दत्ता काळे, डॉ. गायकवाड, डॉ. खैरनार, शिवकुमार डोंगरे, महेश नगरे, जगदीश मेंनकुदळे, गिरीश काथवटे, गणेश काथवटे, रवी काथवटे, बाबुराव काथवटे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शशिकांत देशमुख म्हणाले की, डॉ डोंगरे यांनी सर्वाना मोटिवेट केले. तसेच विद्यापीठात अनेक वेळा महाविद्यालयाच्या कामासाठी गेले पण कधीही टीएडीए घेतला नाही.
यावेळी प्रा. मोहळकर, माजी अधिक्षक ज्ञानदेव बांगर, लोंढे साहेब, प्रा. गाडेकर, कन्या पुजाताई, स्नेहल डोंगरे, प्रा डोंगरे, प्रा. लहिरे, डॉ. सुनील बोराडे, ऋषिकेश देशमुख यांनी मनोगते व्यक्त केली.
यावेळी बोलताना प्रा. गाडेकर म्हणाले की, डॉ. डोंगरे यांच्या कामाची चतु:सुत्री होती.
प्रशासनाभिमुख काम, सचोटी, प्रमाणिकपणा, नियोजनबद्ध काम ते हाडाचे शिक्षक आहेत. तसेच त्यांचा मित्रपरिवार खुप मोठा आहे. सरांचे कार्य जामखेड कर विसरणार नाहीत.