श्रीमद्भागवत कथा मनुष्याला विशुद्ध आनंद देणारी – हभप गोविंद महाराज जाटदेवळेकर कै. देवराव दिगांबर वराट (गुरूजी) यांच्या पुण्यस्मणार्थ आयोजित भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा सप्ताहाची सांगता
श्रीमद्भागवत कथा मनुष्याला विशुद्ध आनंद देणारी – हभप गोविंद महाराज जाटदेवळेकर
कै. देवराव दिगांबर वराट (गुरूजी) यांच्या पुण्यस्मणार्थ आयोजित भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा सप्ताहाची सांगता
भागवत कथा ही मनुष्याला विशुद्ध आनंद आणि शांती देणारी आहे. ही कथा केवळ कथा नाही, तर ती एक आध्यात्मिक अनुभव आहे, जो माणसाला आत्मिक स्तरावर जोडतो आणि मोक्षाकडे मार्ग दाखवतो. भागवत कथा श्रवणाने मन शुद्ध होते, नकारात्मक विचार कमी होतात आणि आत्मिक प्रगती होते असे हभप गोविंद महाराज जाटदेवळेकर यांनी सांगितले.
जामखेड तालुक्यातील साकत येथे कै. देवराव दिगांबर वराट (गुरूजी) यांच्या चतुर्थ पुण्यस्मणार्थ श्रीमत भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा सप्ताहाचे आयोजित करण्यात आले होते कथाव्यास श्री हभप प्रज्ञाचक्षू मुकुंद ( काका) महाराज जाटदेवळेकर व हभप गोविंद महाराज जाटदेवळेकर यांच्या सुश्राव्य वाणीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्यात
भागवत महात्म्य, नारदचरित्र, श्री शुकागमन, नृसिंह अवतार, वामन अवतार, श्रीरामावतार, श्रीकृष्णलीला, श्री गोवर्धन पुजन, रूक्मिणी स्वयंवर, सुदामा पुजन व कथेची सांगता राष्ट्रीय किर्तनकार हभप ज्ञानेश्वर महाराज वाबळे आळंदी देवाची यांच्या किर्तनाने झाली
कै. देवराव दिगांबर वराट (गुरूजी) यांच्या चतुर्थ पुण्यस्मणार्थ श्रीमत भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन प्रा. अरूण वराट व कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट यांनी केले होते.
या कथेसाठी मोठ्या संख्येने परिसरातील भाविक भक्तांनी श्रवणाचा लाभ घेतला.