श्री साकेश्वर सायन्स ज्युनियर काॅलेज साकत व जय हनुमान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कोल्हेवाडी चे बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश

0
470

जामखेड न्युज—–

श्री साकेश्वर सायन्स ज्युनियर काॅलेज साकत व जय हनुमान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कोल्हेवाडी चे बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश

तालुक्यातील संत ज्ञानेश्वर सेवाभावी संस्था साकतचे श्री साकेश्वर सायन्स ज्युनियर काॅलेज साकत व जय हनुमान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कोल्हेवाडी या दोन्ही काॅलेजचा बारावी परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. या घवघवीत यशाबद्दल यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शन करणाऱ्या प्राध्यापकांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

साकत येथील श्री साकेश्वर सायन्स ज्युनियर काॅलेज चा बारावी परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला आहे.

प्रथम क्रमांक आमले प्रेरणा यशवंत 87.83 टक्के
द्वितीय क्रमांक गायकवाड गौरी गोरख – 83.33 टक्के
तृतीय क्रमांक – गागरे ईश्वरी सुरेश – 80.83 टक्के

तर जय हनुमान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कोल्हेवाडी
प्रथम क्रमांक गायकवाड श्रेयस बाळासाहेब 82.00 टक्के
द्वितीय क्रमांक कोल्हे प्रशांत महादेव 79.50 टक्के
तृतीय क्रमांक काटकर नम्रता राजेंद्र 78.67 टक्के

अशा प्रकारे श्री साकेश्वर सायन्स ज्युनियर काॅलेज साकत व जय हनुमान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कोल्हेवाडी चे बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष प्रा अरुण वराट व सचिव कैलास वराट (सर) उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती जामखेड यांनी अभिनंदन केले आहे. तसेच दोन्ही काॅलेज मध्ये क्राँप सायन्स (200 गुणाचा ) विषय उपलब्ध असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here