बोरीवली ते जामखेड बस अहिल्यानगर येथून जामखेड च्या दिशेने येत असताना वाघळूज घाटात आज दुपारी बसचा टायर फुटला भर घाटात टायर फुटल्याने मोठा आवाज येऊन एकच हाहाकार उडाला पण चालकाच्या सतर्कतेमुळे बस रस्त्याच्या कडेला घेत उभी केली.
बोरीवली ते जामखेड बस प्रवाशांनी खचाखच भरलेली होती. आज दुपारी भर घाटात अचानक बसचा टायर फुटल्याने मोठ्या आवाजाने सर्व प्रवाशांमध्ये एकच हाहाकार उडाला पण चालकाने प्रसंगावधान राखत बस एका बाजूला घेत उभी केली.
सध्या जरी काही नवीन बस आलेल्या असल्या तरी अनेक जुन्या निकामी झालेल्या बस आहेत. अनेक वेळा रस्त्यात कोठेही बंद पडतात. यामुळे प्रवाशांचे हाल होतात.
जुन्या बस, खराब झालेले टायर, गिअर बाँक्स बिघाड, इंजिनमध्ये बिघाड, यामुळे या बस रस्त्यावर आल्यानंतर मोठ्या प्रमाणात धुर मारत मोठ्या प्रमाणावर वायू प्रदूषण करतात. त्या चांगल्या प्रकारे दुरूस्त होउनच रस्त्यावर येणे आवश्यक आहे.
अशा खराब टायरच्या बस तसेच अनेक स्पेअर पार्ट खराब झालेल्या बस रस्त्यावर धावत असल्याने प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. चांगल्या प्रकारे दुरूस्त करूनच व चांगल्या टायरच्या बसच सोडल्या पाहिजेत.