जामखेड येथे भिसीच्या पैशावरून दोघांना जबर मारहाण, दोघांना अटक

0
1469

जामखेड न्युज—–

जामखेड येथे भिसीच्या पैशावरून दोघांना जबर मारहाण, दोघांना अटक

जामखेड येथील आरोळे वस्ती याठिकाणी बीसीच्या पैशावरून दोघांना लोखंडी गज व काठीने मारहाण करून जखमी केले. तसेच भिसीचे पैसै दिले नाहीत तर जीवे मारुन टाकु आशी धमकी दिली.याप्रकरणी एकुण सात जणांवर जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. मात्र उर्वरित सर्व आरोपींना तातडीने अटक करून कारवाई करण्याची मागणी फिर्यादी यांनी केली आहे.

या प्रकरणी पोपट दुर्गा लोखंडे, बापु ताया लोखंडे, सुरेश मुकिंद लोखंडे, चंदर बापु लोखंडे, शिवाजी तात्या लोखंडे, विष्णु शंकर लोखंडे व हनुमंत महंमद लोखंडे सर्व रा. आरोळे वस्ती, जामखेड आशा सात जणांवर जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील सुरेश मुकिंद लोखंडे व चदर बापु लोखंडे या दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, फिर्यादी तात्या मोतीराम लोखंडे रा. आरोळे वस्ती यांनी सन 2024 मध्ये शिवाजी पंचळे यांचेकडून तीन लाख रुपयांची भीसी विकत घेतली होती या भीसी मध्ये एकुण 30 मेंबर होते व सदर बीसीचा चालक सुरेश लोखंडे रा. आरोळे वस्ती हा आहे. दि 1 मे 2025 रोजी रात्री सव्वानऊ वाजता फिर्यादी व त्याचा चुलत भाऊ यलाप्पा लोखंडे हे घरी जात असताना पोपट दुर्गा लोखंडे, बापु ताया लोखंडे व सुरेश मुकिंद लोखंडे यांनी आवाज देऊन थांबवले व एका हॉटेलच्या शेडमध्ये बीसीच्या पैशाबाबत चर्चा करावयाची आहे तु तिकडे ये असे सांगितले.

फिर्यादी हे त्या ठिकाणी आले असता आरोपी फिर्यादीस म्हणाले की भिसीचे सव्वातीन लाख रुपये तुझ्याकडे फिरत आहेत ते आम्हाला दे मात्र फिर्यादी म्हणाला की भिसीचे पुर्ण पैसै मी भरले आहेत. माझ्याकडे भिसीचे पैसै नाहीत असे म्हणताच वरील सर्वांना फिर्यादीचा राग येऊन त्यांनी फिर्यादीस मारहाण करण्यास सुरुवात केली. ही घटना फिर्यादीचा भाऊ आशोक मोतीलाल लोखंडे यास समजताच तो देखील त्या ठिकाणी आला. यावेळी आरोपींनी दोघांनाही काठी व लोखंडी गजाने मारहाण केली व पैसै दिले नाहीत तर तुला सोडणार नाही अशी धमकी फिर्यादीला देऊन तेथून आरोपी निघुन गेले.

या घटनेत फिर्यादी व त्याचा भाऊ गंभीर जखमी झाला असल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यानंतर जखमी तात्या मोतीराम लोखंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोपट दुर्गा लोखंडे, बापु ताया लोखंडे, सुरेश मुकिंद लोखंडे, चंदर बापु लोखंडे, शिवाजी तात्या लोखंडे, विष्णु शंकर लोखंडे व हनुमंत महंमद लोखंडे सर्व रा. आरोळे वस्ती, जामखेड आशा सात जणांवर जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे. कॉ. प्रवीण इंगळे हे करीत आहेत.


चौकट

भिसीचे मी सर्व पैसै भरुन देखील आरोपी मला पैसे मागत आहेत तसेच जीवे मारण्याची धमकी देत आहेत. त्यामुळे माझ्या जीवास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे तातडीने सर्व आरोपींना अटक करुन कारवाई करण्यात यावी अन्यथा मी काही दिवसात आमरण उपोषण करणार आहे. असे देखील फिर्यादी तात्या मोतीराम लोखंडे यांनी बोलताना सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here