Wednesday, February 11, 2026
Home ताज्या बातम्या माजी सभापती संजय वराट सरांना पितृशोक रावसाहेब वराट गुरूजी यांचे निधन

माजी सभापती संजय वराट सरांना पितृशोक रावसाहेब वराट गुरूजी यांचे निधन

0
862

जामखेड न्युज—–

माजी सभापती संजय वराट सरांना पितृशोक रावसाहेब वराट गुरूजी यांचे निधन

 

जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती संजय वराट यांचे वडील रावसाहेब जगन्नाथ वराट गुरूजी वय ८५ यांचे अल्पशा आजाराने साकत येथे राहत्या घरी निधन झाले. यामुळे वराट कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अंत्यसंस्कार सायंकाळी ८.३० साकत वराट वस्ती येथे होईल.

रावसाहेब वराट गुरूजी यांची संपूर्ण सेवा आष्टी तालुक्यात गेली धामणगाव व घुमरी पिंपरी येथे संपूर्ण सेवा गेली २००१ मध्ये ते सेवानिवृत्त झाले होते. त्यांचा स्वभाव खुपच मनमिळाऊ होता.

काही दिवसांपूर्वी त्यांना त्रास होऊ लागल्याने नगर येथे खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी त्यांना घरी आणले होते. आज राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगी (विवाहित) मुलगा, सुन, नातवंडे असा परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!