साकतने आजपर्यंत संस्थेसाठी अनेक हिरे दिले – उद्धवबापू देशमुख
रमेश अडसूळ व हनुमंत वराट यांचा सेवापुर्ती कृतज्ञता सोहळा संपन्न
संस्थेच्या विकासात व विस्तारात साकत, राजुरी, हाळगाव ग्रामस्थांचे योगदान खुप आहे. तसेच साकतने तर संस्थेसाठी अनेक हिरे दिले आहेत. यामुळे संस्थेचा चांगला नावलौकिक झाला आहे. चांगले काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पाठिशी संस्था नेहमीच असते. असेच चांगले काम करणारे ग्रेट व्यक्तीमत्व मुख्याध्यापक रमेश अडसूळ व कर्मचारी हनुमंत वराट हे आज सेवानिवृत्त होत आहेत यानिमित्त आयोजित कार्यक्रमात उद्धवबापू देशमुख बोलत होते.
श्री भैरवनाथ विद्यालय हाळगाव चे मुख्याध्यापक व ल. ना. होशिंग विद्यालयाचे कर्मचारी हनुमंत वराट यांचा सेवापुर्ती कृतज्ञता सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्धवबापू देशमुख तर प्रमुख पाहुणे म्हणून अरूणशेठ चिंतामणी, संचालक अशोक शिंगवी, माजी सभापती संजय वराट, माजी जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचरणे, जामखेड महाविद्यालय जामखेड चे प्राचार्य डॉ. एम. एल डोंगरे, प्राचार्य बी. ए. पारखे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट, किसनराव ढवळे, डॉ. सुनील नरके, शिक्षक नेते शिवाजीराव ढाळे, दत्तात्रय काळे, माजी प्राचार्य श्रीराम मुरूमकर, सादेक शेख, श्रीकांत होशिंग, अनंता खेत्रे, रमेश चौधरी, पी. टी. गायकवाड, दत्तात्रय राजमाने, शहादेव वराट सह जामखेड, साकत, हाळगाव येथील अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना उद्धवबापू देशमुख म्हणाले की. ग्रामस्थ व संस्था यांना विश्वासात घेत रमेश अडसूळ यांनी आदर्श मुख्याध्यापक म्हणून काम केले तर सेवक पदाला खरी प्रतिष्ठा हनुमंत वराट यांनी मिळवून दिली. हनुमंत वराट यांना प्रत्येक विभागात मागणी होती.
यावेळी बोलताना जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती संजय वराट म्हणाले की, रमेश अडसूळ व हनुमंत वराट यांनी विद्यार्थी दशेत गरिबीचे चटके सहन केले. दोघांनीही आदर्श अशी नोकरी केली. तिही विनातक्रार ही सोपी गोष्ट नाही. आजही नानाचे एकत्र कुटुंब आदर्श आहे.
यावेळी बोलताना मुख्याध्यापक रमेश अडसूळ म्हणाले की, मी उच्च शिक्षित असुनही पुण्यात न राहता आपल्या परिसरात नोकरी केली. चांगल्या कामासाठी संस्था नेहमीच सहकार्य करते. संस्था एक कुटुंब म्हणून नेहमीच पाठिशी राहिली. संस्थेच्या प्रगतीसाठी नेहमीच प्रयत्नशील राहिलो.तालुक्यात सर्वात आगोदर सेमी इंग्रजी सुरू केली. काम करताना सर्वाचे सहकार्य लाभले. यावेळी हनुमंत वराट यांनी ही संस्था खुपच चांगली असल्याचे सांगितले.
यावेळी पुजा वराट, सौ. राजश्री अडसूळ, कृष्णा वराट, दिनेश शिंदे, ज्ञानदेव मुरूमकर, प्राचार्य डॉ एम. एल. डोंगरे, डॉ. सुनील शिवाजीराव ढाळे सोमनाथ पाचरणे, श्रीकांत होशिंग, रमेश चौधरी यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हनुमंत वराट व घायतडक मँडम यांनी तर आभार पी. टी. गायकवाड यांनी मानले.