जामखेड पंचायत समितीतील आणखी एक कर्मचारी निलंबित महिन्यात दुसरा कर्मचारी निलंबित

0
1684

जामखेड न्युज—–

जामखेड पंचायत समितीतील आणखी एक कर्मचारी निलंबित

महिन्यात दुसरा कर्मचारी निलंबित

गेल्या महिन्यात जिवंत व्यक्तीला मयत दाखवले तसेच कामात हलगर्जीपणा यामुळे एक ग्रामसेवक निलंबन झाले होते. महिन्याभरात परत जामखेड पंचायत समिती मधील कर्मचारी कनिष्ठ सहाय्यक सुरज मुंढे यांना अनाधिकृत गैरहजर रहाणे, कार्यालयीन कामकाजात हलगर्जिपणा करणे, वरिष्ठांच्या आदेशाचे अवमान करणे अशा प्रकारचे गैरवर्तनामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी अहिल्यानगर यांनी निलंबनाचा आदेश काढला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

मुंढे सुरज दिलावर, कनिष्ठ सहाय्यक (लिपीक) पंचायत समिती जामखेड येथे कार्यरत असताना अनाधिकृत गैरहजर रहाणे, कार्यालयीन कामकाजात हलगर्जिपणा करणे,वरिष्ठांच्या आदेशाचे अवमान करणे अशाप्रकारचे गैरवर्तन केलेले आहे. सदर बाब ही कार्यालयीन शिस्तीचे उल्लघंन करणारी आहे. मुंढे हे जिल्हा परिषद कर्मचारी असुन त्यांनी सदैव निरपवाद,सचोटीने व कर्तव्य परायण असणे आवश्यक आहे. तथापि कर्तव्याचे पालन न करुन गैरवर्तन केल्याने महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम १९६७ चे नियम ३ चा भंग झालेला आहे. त्या अर्थी महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम १९६४ चे नियम ३मध्ये दिलेल्या तरतुदीस अधिन राहुन मला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन या आदेशा द्वारे मुंढे सुरज दिलावर, कनिष्ठ सहाय्यक (लिपीक) पंचायत समिती जामखेड, यांना सदर आदेशाच्या दिनांका पासून जिल्हा परिषद सेवेतून निलंबीत करीत आहे.

आणखी असाही आदेश देण्यात येत आहे की, हा आदेश आमलात राहील तेवढया कालावधीत मुंढे सुरज दिलावर, कनिष्ठ सहाय्यक (लिपीक) पंचायत समिती जामखेड, यांचे मुख्यालय पंचायत समिती पारनेर येथे राहिल मुंढे सुरज दिलावर, कनिष्ठ सहाय्यक (लिपीक) पंचायत समिती जामखेड,यांना गरविकास अधिकारी पंचायत समिती पारनेर यांच्या पूर्व परवानगी शिवाय मुख्यालय सोडता येणार नाही.


मुंढे सुरज दिलावर, कनिष्ठ सहाय्यक (लिपीक) पंचायत समिती जामखेड, यांना महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी स्वीयत्तर सेवा आणि निलंबन, बडतर्फी व सेवेतुन काढून टाकणे यांच्या काळातील प्रदाने) नियम १९८१ मधील नियम ६८ च्या तरतुदी नुसार निलंबन भत्ता व पुरक भत्ते देण्यात यावेत.

निलंबनाच्या कालावधीत मुंढे सुरज दिलावर, कनिष्ठ सहाय्यक(लिपीक) पंचायत समिती जामखेड, यांनी खाजगी नोकरी स्विकारु नये त्यांनी तसे केल्यास ते दोषारोप त्यांचे वर ठेवण्यात येईल तसेच ते निंलबन निर्वाह भत्ता गमविण्यास पात्र ठरतील.

निलंबनाचे कालावधीत निंलबन निर्वाह भत्ता जेव्हा जेव्हा देण्यात येईल त्या त्या वेळी आपण खाजगी नोकरी स्विकारली नाही अथवा कोणताही खाजगी धंदा वा व्यवसाय करीत नाही अशा आशयाचे प्रमाणपत्र मुंढे सुरज दिलावर, कनिष्ठ सहाय्यक (लिपीक) पंचायत समिती जामखेड यांनी सादर करावे. निलंबानाचे कालावधीत मुंढे सुरज दिलावर, कनिष्ठ सहाय्यक (लिपीक) पंचायत समिती जामखेड यांना निलंबन निर्वाह भत्ता देण्याबाबतची कार्यवाही गटविकास अधिकारी,पं. स. पारनेर. हे करतील.सदर आदेश अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या www.nagarzp.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक 20250429040051 असा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here