आंतरराष्ट्रीय खेळाडू व वुशू प्रशिक्षक लक्ष्मण उदमले यांना गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार
जामखेड च्या शिरपेचात मानाचा तुरा
आंतरराष्ट्रीय खेळाडू व वुशू प्रशिक्षक लक्ष्मण उदमले यांना सन २०२३- २४ वर्षातील सर्वोत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक (वुशू) पुरस्कार देण्यात आला असून काल महाराष्ट्र दिनी पुरस्कार वितरण झाले या पुरस्काराबद्दल जामखेड अकोले नगर तसेच मित्रमंडळी नातेवाईक व विद्यार्थी यांच्या कडून अभिनंदन होत आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय,महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, अहिल्यानगर यांच्या वतीने जामखेड चे आंतरराष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक लक्ष्मण भगवान उदमले यांना जिल्ह्याचे पालकमंत्री ना.मा.डॉ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते व जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे, जिल्हा अधिकारी पंकज आशिया व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थितीमध्ये गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार देण्यात आला.
लक्ष्मण उदमले हे आंतराष्ट्रीय रौप्य पदक विजेते आहेत व त्यांनी पतियाळा येथे वुशु खेळामध्ये NSNIS केलेले आहे.
त्यांनी गेल्या पंचवीस वर्षांपासून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये वुशु खेळाचा प्रचार व प्रसार करण्याचे काम केलेले आहे.त्यांनी अनेक राष्ट्रीय खेळाडू घडविलेले आहेत.अनेक खेळाडू शासनाच्या सेवेमध्ये अधिकारी पदावर काम करत आहेत.
त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल जिल्ह्याचे पालक मंत्री ना.मा. डॉ.राधाकृष्ण विखे पाटील,विधान परिषदेचे अध्यक्ष प्रा.राम शिंदे साहेब ,आमदार रोहित दादा पवार,जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे, राज्य वुशु संघटनेचे सचिव सोपान कटके,प्रा.मधुकर राळेभात,उमेश देशमुख,प्राचार्य डॉ.देविदास राजगिरे यांनी अभिनंदन केले.