महात्मा बसवेश्वरांनी स्त्री पुरुष समानतेची शिकवण दिली – शिवकुमार डोंगरे
जामखेड मध्ये महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी
काय कवे कैलास’ हा श्रममंत्र ज्या थोर क्रांतिकारी महापुरुषांनी दिला, पिढ्यानपिढ्या बहुजन समाजाला अज्ञानात ठेवून कर्मकांडाचे पांघरून घालून पद्धतशीरपणे शोषण करणाऱ्या वैदिक कर्मठांच्या विषमतावादी समाजरचनेच्या चिरेबंदी बुरुजास ज्यानी सुरुंग लावला. वंचित, उपेक्षित शुद्रातीशुद्राना एकत्र करुन त्यांच्याशी विचार विनिमय करण्यासाठी अनुभव मंटप ही लोकसंसद यांनी बाराव्या शतकात स्थापन केली. खऱ्या अर्थाने महिलांना 50 टक्के आरक्षण बाराव्या शतकात दिले. अनिष्ट प्रथा, परंपरा,अज्ञान, अंधश्रद्धा, जातीभेद व वर्णभेद यावर ज्यानी प्रहार केला त्यांचे नाव महात्मा बसवेश्वर यांनी स्त्री पुरुष समानतेची शिकवण दिली असे मत शिवकुमार डोंगरे यांनी व्यक्त केले
जगद्जोती सूर्यक्रांती महात्मा बसवेश्वरांनी 12 व्या शतकात श्री पुरुष समानतेची शिकवण आंतरजातीय विवाह ,पहिले संसदीय कामकाज, जातीभेद नष्ट करून सर्वांनी एकत्र राहणे असे अनेक कामे केली आहेत.
जामखेड तालुक्यातील अनेक गावात व जामखेड तहसील व नगरपरिषद,शासकीय ऑफिस मध्ये जयंती साजरी केली यावेळी तहसीलदार गणेश माळी, मुख्याधिकारी अजय साळवे, उद्योजक आकाशजी बाफना, शिवकुमार डोंगरे ,बजरंग सरडे, यांनी मनोगत व्यक्त केले.
वर्णव्यवस्थेचे विकृत विद्रूप रुप म्हणजेच जातीव्यवस्था. स्त्री- पुरुष भेदाभेद होता. लोक जाती- पाती, वर्णव्यवस्थेत व अंधश्रद्धेत गुरफटून गेले होते. विशेषत: वीरशैव धर्माला ग्लानी आली होती. या धर्माचे अनुयायांवर इतर धर्मांच्या विचाराचा व आचरणाचा पगडा वीरशैव धर्मांवर पडू लागला होता. अशा कालावधीत महात्मा बसवेश्वर यांचा जन्म झाला आणि समाजाला योग्य दिशा देण्याचे काम त्यांनी केले.
यावेळी उपस्थित शिवा संघटना जिल्हा उपाध्यक्ष शिवकुमार डोंगरे, युवा उद्योजक आकाश बाफना , महेश नगरे, शिवा संघटना अध्यक्ष जगदीश मेंनकुदळे, राहुल लोहकरे, अनिल लोखंडे, अनिल लोहकरे , सुनील ओझर्डे, अमोल लोहकरे, अमरनाथ डोंगरे, बजरंग सरडे,आंनद लोहकरे, अशोक डोंगरे, विठ्ठल परांडकर ,अमृत डोंगरे नय्युमभाई सुभेदार, महेश कस्तुरे ,विजय डोंगरे,गणेश गवसणे सह समाज बांधव व इतर बांधव उपस्थित होते.
यावेळी शिवा संघटना जिल्हा उपाध्यक्ष शिवकुमार डोंगरे यांनी सर्वांचे आभार मानले व जयंतीच्या शुभेच्छा दिल्या