Sunday, September 27, 2026
Home ताज्या बातम्या जलजीवन मिशन जामखेड तालुक्यात फेल, ठेकेदार व अधिकारी मालामाल तर जनता पाण्यावाचून...

जलजीवन मिशन जामखेड तालुक्यात फेल, ठेकेदार व अधिकारी मालामाल तर जनता पाण्यावाचून बेहाल

0
831

जामखेड न्युज—–

जलजीवन मिशन जामखेड तालुक्यात फेल, ठेकेदार व अधिकारी मालामाल तर जनता पाण्यावाचून बेहाल

 

जलजीवन योजनेचा काही ठिकाणी ठेकेदार व अधिकारी यांनी संगनमताने निधी हडप करत बोगस कामे केलेली आहेत तर काही ठिकाणी कागदावर कामे दाखवून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी हडप केला आहे. गावोगावी शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करूनही ग्रामस्थ पाण्यावाचून वंचित आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरूच आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात सावळागोंधळ आहे. ठेकेदाराच्या या कामाकडे अधिकारी मात्र अर्थपूर्ण दुर्लक्ष करत आहेत. जलजीवन मिशन जामखेड तालुक्यात फेल झाले आहे यात ठेकेदार व अधिकारी मालामाल तर जनता पाण्यावाचून बेहाल आहे. लवकरच सर्वच कामाची प्रशासकीय चौकशी
लागणार असल्याची माहिती समोर येत आहे. चौकशीत बोगस कामाचा पर्दाफाश होणार आहे.

तालुक्यात अनेक ठिकाणी ठेकेदाराने मनमानी कारभाराने ही योजना कशीबशी एक दीड फुटापर्यंत पाईप गाढले आहेत काही ठिकाणी तर पुढच्या कडेला आणि मागच्या कडेलाच पाईप गाढले आहेत मध्ये एकही पाईप गाढलेला नाही अशा पद्धतीने ही योजना कागदावरतीचं रंगून घाईगडबडीमध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ठेकेदारांना बिल अदा केले आहे, योजना चालू करताना भूजल सर्वेक्षणांनी देखील खोटे दाखले देऊन ठेकेदारांना पाठीशी घालण्याचे काम केले आहे. या सर्व कामाची चौकशी होऊन दोषींवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी ग्रामस्थांनी केलेली आहे. यानुसार लवकरच चौकशी लागणार असल्याची माहिती समोर आली आहे.

अनेक ठिकाणी गावातील ग्रामपंचायतीना विचारात न घेता मनमानी कारभाराने ही योजना कशीबशी एक दीड फुटापर्यंत पाईप गाढले आहेत काही ठिकाणी तर पुढच्या कडेला आणि मागच्या कडेलाच पाईप गाढले आहेत मध्ये एकही पाईप गाढलेला नाही अशा पद्धतीने ही योजना कागदावरतीचं रंगून घाईगडबडीमध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ठेकेदारांना बिल अदा केले आहे, योजना चालू करताना भूजल सर्वेक्षणांनी देखील खोटे दाखले देऊन ठेकेदारांना पाठीशी घालण्याचे काम केले आहे, टाटा च्या समितीने देखील जलजीवन मिशन ही योजना उत्कृष्ट दर्जाची झाली आहे असे खोटे दाखले दिलेले आहेत, असे खोटे पूर्णत्वाचे दाखले दिलेच कसे त्या संबंधित टाटा समितीची देखील चौकशी करण्यात यावी व त्यांच्यावर देखील तात्काळ कारवाई करावी.

ही योजना चालू असताना संबंधित गावातील गावकऱ्यांनी पाणीपुरवठा विभागाचे अभियंता, उपअभियंता कनिष्ठ अभियंता व गटविकास अधिकारी यांच्याकडे अनेक वेळेस तोंडी व लेखी तक्रार देखील केलेल्या आहेत कारण ठेकेदार व अधिकारी पुढारी यांची साखळी असल्याने त्यांनी गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच गावकऱ्यांना कोणालाचं विश्वासात न घेता ही योजना निकृष्ट दर्जाची पूर्ण केली आहे, या योजनेची चौकशी केल्याशिवाय संबधी ठेकेदाराचे बील अदा करण्यात येऊ नये असे अनेक गावातील गावकऱ्यांनी प्रशासनास लेखी पत्र दिले असताना देखील संबंधित अधिकाऱ्यांनी घाईगडबड करत ठेकेदारांचे संपूर्ण बील आदा केले आहे.

पीडब्ल्यूडीची परवानगी न घेताचं सार्वजनिक रस्त्याच्या मध्यभागातून पाईप गाढले आहेत विहिरीची खोदाई, ट्रायल बोर, रुंदी, मोटर घर, इलेक्ट्रिक मोटर इत्यादी कोणतीचं कामे अंदाज पत्रकारानुसार केलेली नाहीत.

त्यामुळे या योजनेचे काम झाल्यापासून ते आजपर्यंत जलजीवन योजनेचे पाणी अनेक गावातील गावकऱ्यांच्या घरामध्ये गेले नाही मग ही योजना कशाकरिता राबविण्यात आली होती या सर्व कामाची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करून संबंधित अधिकारी ठेकेदारांवरती कठोर कारवाई करण्यात यावी व या योजनेचे पाणी प्रत्येक घरामध्ये गेलेचं पाहिजे. यासाठी अनेक ग्रामस्थ आता पुढे येत आहेत. यानुसार लवकरच चौकशी सुरू होईल अशी माहिती समोर येत आहे.

कारण कर्जत जामखेड तालुक्यातील ज्या गावांमध्ये जलजीवन पाणीपुरवठा योजनेचे काम झाले आहे त्यागावांना पुढील पन्नास वर्षे पाणीपुरवठा योजनेसाठी शासन स्तरावरून कोणताचं निधी दिला जात नाही यासाठी आत्ता नाही तर परत नाही या घोषवाक्य प्रमाणे गरीबांच्या हक्काच्या व अधिकाराच्या पैशावरती ज्या ठेकेदार,अधिकारी व पुढाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांवरती डल्ला मारला आहे त्यांना शासनाने कठोरातील कठोर शिक्षा करावी अशी नागरिकांची मागणी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!