सीआरपीएफ शहिद जवान गणेश कृष्णाजी भोसले व कृष्णाजी भोसले यांच्या स्मरणार्थ वृद्धाश्रमास अन्नदान.

0
456

जामखेड न्युज—–

सीआरपीएफ शहिद जवान गणेश कृष्णाजी भोसले व कृष्णाजी भोसले यांच्या स्मरणार्थ वृद्धाश्रमास अन्नदान.

सीआरपीएफ शहिद जवान गणेश कृष्णाजी भोसले व कै.कृष्णाजी भोसले यांच्या स्मरणार्थ मयूर भोसले व भोसले परिवाराच्या वतीने श्री संत ज्ञानेश्वर माऊली वृद्धाश्रम नळी वडगाव येथील वृद्धांना मिष्ठांना भोजन देण्यात आले.

प्रत्येक सामाजिक क्षेत्रात भोसले कुटुंबीयांचे कार्य खरोखर वाखण्याजोगे आहे असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते तथा जैन कॉन्फरसचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य दिल्ली संजय कोठारी यांनी केले.

यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी म्हणाले नेहमीच भोसले परिवारातील
पांडूराजे भोसले आणि मयूर भोसले हे समाज उपयोगीकार्य करत असतात यांनी आज शहीद झालेले गणेश भोसले आणि पिताश्री कै कृष्णाजी भोसले यांच्या स्मृती प्रित्यर्थ वृद्धाश्रमातील वृद्ध महिला पुरुषांना मिष्ठांन भोजन देऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे. 

यावेळी प्रमुख उपस्थिती कृषी उत्पन्न बाजार संचालक विठ्ठल चव्हाण, शिवप्रतिष्ठान अध्यक्ष पांडुरंग भोसले, मयूर भोसले, निलेश भोसले, किशोर गायवळ, कल्याण भोसले, नितीन भोसले, साळुंके बी एस, संभाजी देशमुख,गणेश देवकाते, धनंजय भोसले, संदीप बहिर, रोहिदास केकान, वृद्धाश्रम संचालक माऊली लोखंडे, काका चव्हाण, संपत मुळे, माता भगिनी उपस्थित होते.

सर्वांनी प्रतिमा पूजन करून आदरांजली वाहिली व नंतर भजन कीर्तन भक्तिमय वातावरणात कार्यक्रम करण्यात आला.

सर्वांनी काश्मीर पहलगाम येथील आतंकवादी हल्ल्याचा निषेध करून हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या २६ नागरिकांना आदरांजली वाहण्यात आली.
वृद्धाश्रमाचे संचालक माऊली लोखंडे यांनी भोसले कुटुंबीयांनी अन्नदान केल्याबद्दल त्यांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here