जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
जामखेड येथील ल.ना .होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इतिहास शिक्षक तसेच योग शिक्षक बाळासाहेब आप्पा पारखे यांना कै. ल. रा देशमुख ऊर्फ तात्यासाहेब देशमुख पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या पुरस्काराबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
परीसरातील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत यशाच्या शिखरावर पोहचलेल्या मान्यवरांना तात्यासाहेब देशमुख पुरस्कार देण्यात येतो. हे पंचविसाव्या वर्षे आहे. यावर्षीचा कै. ल. रा. देशमुख उर्फ तात्यासाहेब देशमुख पुरस्कार योग शिक्षक बी. ए. पारखे यांना प्रदान करण्यात आला.
दि. १ आॅगस्ट रोजी जामखेड येथील लोकमान्य वाचनालयाच्या गोपाळशेठ सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमात या पुरस्कारचे वितरण करण्यात आले. शिक्षक हा राष्ट्राचा निर्माता असून विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत असतो. आशा ध्येयवादी, उपक्रमशील शिक्षकांना त्यांच्या कामात प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांच्या गुणांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने कै. तात्यासाहेब देशमुख या नावाने आदर्श शिक्षक पुरस्कार दर वर्षी दिला जातो. या वर्षी ल.ना .होशिंग माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक बाळासाहेब आप्पा पारखे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य मराठी साहित्य परिषदचे अध्यक्ष मिलिंद जोशी, समाज सेविका सौ. वेणूताई गावस्कर, शिक्षणतज्ञ डॉ. अ. ल. देशमुख, ल. ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्रीकांत होशिंग, माजी प्राचार्य जी. एल.देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
पुरस्काराबद्दल त्यांचे दि.पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उद्धव बाप्पू देशमुख, उपाध्यक्ष अरुणशेठ चिंतामणी, सचिव शशिकांत देशमुख, खजिनदार राजेशजी मोरे सर्व संचालक मंडळाने व विद्यालयातील प्राचार्य, मुख्याध्यापक व शिक्षकांसह विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.