म्हशी चोरास पाठलाग करून पकडले, पाच लाखाचा मुद्देमाल जप्त, जामखेड तालुक्यातील घटना
दोन म्हशी व एक वगारू जाग्यावर नसल्याने इकडे तिकडे शोधाशोध सुरू केली असता अर्धा किलोमीटर अंतरावर वन विभागाच्या झाडाच्या आसपास एक विना नंबर टेम्पो दिसला त्याची लाईट चालू होती हा टेम्पो संशयित वाटल्याने पोलीस पाटील यांनी खर्डा पोलीसांना फोन केला टेम्पो जवळ जात असताना टेम्पो चालकाने टेम्पो चालू करून पळून जाऊ लागला तेव्हा शेतकरी व पोलीसांनी पाठलाग करून मुद्देमालासह एका आरोपीस पकडले.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी कि, दि.15/04/2025 रोजी रात्री 02/15 वा.चे सुमारास रामहरी एकनाथ निर्मळ.वय-55 वर्षे.धंदा-खाजगी नोकरी. रा- निर्मळवस्ती, दिघोळ. ता-जामखेड.जि-अहिल्यानगर यांच्या दोन म्हशी व एक वगारू(म्हशीचे पिल्लु) हे त्यांना दिसुन आले नाही.
त्यानंतर अशोक भानुदास तागड व पोलीस पाटील राजेंद्र गिते यांनी म्हशीचा व वगारूचा आसपास शोध घेत असताना घरापासुन 500 मीटर अंतरावर वन विभागाच्या झांडाच्या आलीकडे विना नंबरचा टेम्पो उभा असलेला दिसला व त्या गाडीची लाईट चालु असलेली दिसली.तेव्हा त्या गाडीचा संशय आल्याने पोलीस पाटील राजेंद्र गिते यांनी खर्डा पोलीस स्टेशनला फोन करून पोलीसांना माहिती दिली. टेम्पो जवळ जात असताना चालकाने टेम्पो चालु करून पळु लागला.
त्यावेळी फिर्यादी रामहरी एकनाथ निर्मळ,नागरिक अशोक भानुदास तागड , पोलीस पाटील राजेंद्र गिते व खर्डा पोलीस स्टेशन चे प्रभारी अधिकारी विजय झंजाड,दिघोळ बीटचे पोलीस हवालदार संजय जायभाय,रात्रगस्तचे पोलीस अंमलदार बाळु खाडे, चालक पो.हे.कॉ.भगवान पालवे यांनी मिळुन सदर टेम्पोचा पाठलाग करुन टेम्पो पकडला.
त्यावेळी आरोपी धनाजी शिंदे व इतर एक असे अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले व आरोपी नामे तुषार रावसाहेब पवार 18 वर्ष राहणार क्रांतीनगर पाटोदा जिल्हा बीड यास पकडून त्याचे ताब्यातून 1,90,000 रुपये किमतीचे म्हशी व वासरू व 3,20,000 रुपये किमतीचा विना नंबर चा टेम्पो असा एकूण 5,10,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली खर्डा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड, पोलीस अंमलदार संजय जायभाय , बाळू खाडे, चालक भगवान पालवे, फिर्यादी रामहरी एकनाथ निर्मळ,नागरिक अशोक भानुदास तागड , पोलीस पाटील राजेंद्र गिते यांनी केली आहे.