पहा कोण ठरला साकेश्वर केसरी जामखेड तालुक्यात प्रथमच भव्य बैलगाडा शर्यत साकतमध्ये उत्साहात संपन्न

0
610

जामखेड न्युज—–

पहा कोण ठरला साकेश्वर केसरी

जामखेड तालुक्यात प्रथमच भव्य बैलगाडा शर्यत साकतमध्ये उत्साहात संपन्न

श्री साकेश्वर महाराज यात्रा उत्सवानिमित्त साकतमध्ये तालुक्यातील प्रथमच बैलगाडा शर्यत मोठ्या उत्साहात संपन्न झाली सुमारे दोनशेच्या आसपास बैलगाडा शर्यत मध्ये नावनोंदणी झाली होती दिवसभर चाललेल्या या शर्यतीत एकापेक्षा एक सरस बैल होते चित्तथरारक अशा शर्यतीसाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. आयोजकांनी उत्तमपणे नियोजन केले होते. या शर्यतीत एकुण 32 फेऱ्या झाल्या प्रत्येक फेरीत सात बैलगाड्या धावत होत्या. नंतर सेमीफायनलमध्ये मध्ये सात क्रमांक काढले व या सातमधुन प्रथम, व्दितीय, तृतीय, उत्तेजनार्थ क्रमांक काढले.

यावेळी धारा गृप आँफ कंपनी इंदोर चे चेअरमन अनिलजी वराट सह सर्व सदस्य तसेच वंदना ठाकूर इंदोर विश्व बाँडी बिल्डिंग विजेता २०२५ तसेच नित्या सिंग मॅरेथॉन विजेत्या, नित्या सिंग, विष्णू वराट, हभप उत्तम महाराज वराट, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट, उपसरपंच राजाभाऊ वराट, पोलीस पाटील महादेव वराट, देविदास वराट, संजय वराट, डॉ. भगवानराव मुरूमकर, शहादेव वराट, नवनाथ बहिर, महादेव वराट, अविन लहाने, युवराज वराट, दत्तात्रय वराट, श्रीराम घोडेस्वार, साहेबराव वराट, तुकाराम वराट, उद्धव वराट, अजित वराट, प्रविण वराट यांच्या सह अनेक मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.

भव्य दिव्य अशा बैलगाडा शर्यतीत प्रथम क्रमांक पटकावला तो भैरवनाथ प्रसन्न सरपंच दिनकर जमदाडे आरूश बागलाने सचिन ड्रायव्हर बीड अर्जुन व शेखर यांच्या शंभू व बाजी यांनी यांना 51000 रूपये रोख व दोन ढाल असे बक्षीस अनिलजी वराट धारा गृप आँफ कंपनी इंदोर यांच्या तर्फे देण्यात आले.

द्वितीय क्रमांक पटकावला आई तुकाई प्रसन्न विनायक खुडे बेनवडी किंग सैतान शंभू आणी चैन्य याने यांना 31000 रूपये रोख व दोन ढाल हे बक्षीस अनिलजी वराट धारा गृप आँफ कंपनी इंदोर यांच्या तर्फे देण्यात आले.

तृतीय क्रमांक रामगड प्रसन्न बाप्पुसाहेब इंदोरे, केदार इंदोरे, पै. प्रभु भैय्या नगर रूपी अध्यक्ष अशोक सातपुते तात्यासाहेब जगदाळे यांच्या लाडक्या व शंभू याने यास 21000 रूपये अमोल वराट तर्फे तर दोन ढाल अनिलजी वराट यांच्या तर्फे देण्यात आल्या

यानंतर चार क्रमांक उत्तेजनार्थ काढण्यात आले. त्याना चौथ्या क्रमांकास 15000 रूपये दोन ढाल सौजन्य हायटेक नर्सरी अविन लहाने व युवराज वराट, पाचव्या क्रमांकासाठी 9000 रूपये व दोन ढाल सौजन्य आसराजी संतराम वराट यांच्या स्मरणार्थ पोलीस पाटील महादेव वराट, सहावा क्रमांक 7000 रूपये व दोन ढाल सौजन्य दत्तात्रय विठ्ठल वराट, सातवा क्रमांक 5000 रूपये व दोन ढाल सौजन्य केशव आनंदा वराट असे आहेत ढाल सौजन्य अनिलजी वराट धारा गृप आँफ कंपनी इंदोर यांच्या तर्फे देण्यात आल्या

श्री साकेश्वर महाराज यात्रा उत्सवानिमित्त तीन दिवस साकतमध्ये भरगच्च कार्यक्रम राहणार आहेत. सोमवार दि. १४ रोजी कावड मिरवणूक व श्री साकेश्वर महाराज जलाभिषेक, सायंकाळी शेरणी वाटप, रात्री सांस्कृतिक कार्यक्रम तसेच छबिना मिरवणूक मंगळवार दि. १५ रोजी भव्य दिव्य असा महाराष्ट्रात शिस्तबद्ध म्हणून ओळखला जाणारा कुस्त्यांचा हगामा तर बुधवार दि. १६ रोजी
जामखेड तालुक्यातील प्रथमच होत असलेली बैलगाडा शर्यत असे भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

जामखेड तालुक्यात आतापर्यंत कोठेही बैलगाडा शर्यत झालेली नाही साकत येथे प्रथमच झाली यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. समालोचन म्हणून प्रविण घाटे पठारवाडी पुणे तसेच संपत वाघमोडे माळशिरस असतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here