जामखेड न्युज—–
समाजातील एकोपा जपण्यासाठी संयुक्त जयंती – संध्या सोनवणे
तालुक्यातील प्रलंबित प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कानावर घालणार – महेश निमोणकर
आज समाजात विविध जाती धर्मा मध्ये तेढ निर्माण होत चालली आहे. समाजात एकोपा राहावा म्हणून आपण शिव, फुले, आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव आयोजित करत आहोत यातुन महापुरुषांच्या विचारांची जोपासना व्हावी व जामखेड च्या संयुक्त जयंती चा आदर्श राज्यात निर्माण व्हावा अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश युवती अध्यक्षा संध्या सोनवणे यांनी व्यक्त केली.
जामखेड शहरात शिव, फुले, आंबेडकर यांची संयुक्त जयंती निमित्त आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी युवती प्रदेशाध्यक्षा संध्या सोनवणे व राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष महेश निमोणकर उपस्थित होते.
यावेळी बोलताना तालुकाध्यक्ष महेश निमोणकर म्हणाले की, मागील पाच वर्षांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जामखेड साठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला आहे. पण अनेक कामे प्रलंबित आहेत. उपजिल्हा रूग्णालय, पंचायत समिती निवासस्थाने, बस स्थानक, औद्योगिक वसाहत, शहराची पाणीपुरवठा योजना याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर कामे मार्गी लावण्यासाठी दादांना विनंती करणार आहे.
राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा कु. संध्या सोनवणे यांच्या संकल्पनेतून साजरी होत असलेल्या शिव, फुले, आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे.
१७ एप्रिलला साजऱ्या होत असलेल्या संयुक्त जयंती महोत्सवात गायनाच्या सुरेल महफिलीचेही आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून उपमुख्यमंत्री अजित (दादा) पवार असणार आहेत.
जामखेड महाविद्यालय येथे १७ एप्रिल २०२५ रोजी संध्याकाळी ६ वाजता शिव, फुले, आंबेडकर यांची संयुक्त जयंती महोत्सव राष्ट्रवादी युवती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कु. संध्या उद्धव सोनवणे यांच्या आयोजनाने साजरा करण्यात येणार असून गायनाची सुरेल मैफिलचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटक उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री अजितदादा पवार, कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधानपरिषद सदस्य शिवाजीराव गर्जे आदी प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती राहणार आहे.
या संयुक्त जयंती महोत्सवीला आनंद शिंदे यांचा “शिंदे शाही बाणा” व अभिजीत जाधव व अमु जाधव यांचा “शिवशंभो गर्जना” चा कार्यक्रम होणार आहे तरी या कार्यक्रमास उपस्थिती राहण्याचे आवाहन आयोजक राष्ट्रवादी युवती काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा संध्या सोनवणे यांनी केले आहे.