Thursday, February 12, 2026
Home ताज्या बातम्या सिकंदर शेख ठरला श्री साकेश्वर केसरी, मानाची गदा व साडेतीन लाख रुपये...

सिकंदर शेख ठरला श्री साकेश्वर केसरी, मानाची गदा व साडेतीन लाख रुपये बक्षीस पटकावले

0
1491

जामखेड न्युज—–

सिकंदर शेख ठरला श्री साकेश्वर केसरी, मानाची गदा व साडेतीन लाख रुपये बक्षीस पटकावले

श्री साकेश्वर महाराज यात्रेनिमित्त मंगळवारी भरवण्यात आलेल्या भव्य दिव्य हगाम्यामध्ये
प्रथम क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र केसरी पै. सिंकदर शेख विरूद्ध राष्ट्रीय विजेता पै. निशांत कुमार यांच्यात झाली यात सिकंदर शेख याने बाजी मारत ३,५०,०७०( तीन लाख पन्नास हजार सत्तर रूपये) व मानाची गदा पटकावत साकेश्वर केसरी किताब पटकावला धारा गृप आँफ कंपनी इंदोर चे चेअरमन अनिलजी वराट तसेच धारा गृप च्या सदस्यांनी रोख इनाम व चांदीची गदा सिकंदर शेख यास प्रदान केली.

जामखेड तालुक्यातील साकतच्या हगाम्याची एक शिस्तबद्ध हगामा म्हणून नोंद आहे. हगाम्यासाठी अनेक विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. महाराष्ट्र भरातून पैलवानांनी हजेरी लावली होती. यावेळी धारा गृप आँफ कंपनी इंदोर चे चेअरमन अनिलजी वराट सह सर्व सदस्य तसेच वंदना ठाकूर इंदोर विश्व बाँडी बिल्डिंग विजेता २०२५ तसेच नित्या सिंग मॅरेथॉन विजेत्या, नित्या सिंग, पै. देवा थापा नेपाळ, विष्णू वराट, हभप उत्तम महाराज वराट, प्रा. मधुकर राळेभात, जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट, मोहन पवार, अमित जाधव, आयोजक महादेव वराट, संजय वराट, डॉ. भगवान मुरूमकर, राजाभाऊ वराट, माजी कृषी अधिकारी सुरेश वराट, समाजकल्याण अधिकारी विनोद वराट, मोहन अडसूळ, शहादेव वराट, प्रमोद मुरूमकर, देविदास वराट, कांतीलाल वराट, सदाशिव वराट, हरीभाऊ मुरूमकर, नवनाथ बहिर, महादेव वराट, हरीभाऊ वराट, सुनील वराट, पै. बापू जरे, देवकाते, कार्ले, दत्ता वराट, देविदास वराट, सागर मुरूमकर, अजित वराट, बाजीराव वराट, प्रविण वराट नारायण लहाने, अजित वराट, श्रीराम घोडेस्वार, दादा घोडेस्वार, राम घोडेस्वार, कुस्ती निवेदक म्हणून धनाजी मदने पंढरपूर यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी क्रमांक दोनची कुस्ती हनुमंत पुरी विरुद्ध समिर शेख बरोबरीत सुटली, तृतीय क्रमांकासाठी संजय तनपुरे विरुद्ध शुभम मगर यांच्यात झाली यात संजय तनपुरे विजयी झाले. तसेच पै. पृथ्वीराज वनवे विरुद्ध धुळाजी विरकर , संदीप लटके विरुद्ध संदेश शिपकुले, पै संकेत हजारे विरुद्ध पांडुरंग कावळे या सर्व कुस्त्या बरोबरीत सुटल्या.

यावेळी देवा थापा विरुद्ध सुरजीत कुमार या कुस्ती ने प्रेक्षकांचे मोठ्या प्रमाणात मनोरंजन केले.


सोमवार दि. १४ रोजी सकाळी ७.०० वा. कावड मिरवणूक व जल अभिषेक सात नद्यांच्या पाणी मिरवणूक यात लेझीम पथक सहभागी असतात गुलालाची उधळण करत मोठ्या उत्साहात देवाला जल अभिषेक करण्यात येतो. सायंकाळी चार वाजता शेरणी वाटप कार्यक्रम झाला नंतर सायंकाळी सात वाजता सांस्कृतिक कार्यक्रम झाले व मंगळवारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे भव्य दिव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले होते.


कुस्ती हगाम्यासाठी पंच म्हणून पै. बाळासाहेब आवारे, पै. बापू जरे, पै. शरद कार्ले, पै. बालाजी जरे, पै. श्रीधर मुळे, पै. विठ्ठल देवकाते, पै. वसंत रसाळ, पै. सचिन दाताळ, पै. आलेश जगदाळे, पै. भारत शिंदे, पै. मारूती गाडे, पै. मोहन पवार, पै. शकिल शेख, पै. मोहन अडसूळ, पै. सुरेश मुरूमकर, पै. डांबे मामा तर कुस्ती निवेदक म्हणून धनाजी मदने पंढरपूर यांनी काम पाहिले.

या मैदानाचे मुख्य आकर्षण महाराष्ट्र केसरी सिंकदर शेख, राष्ट्रीय विजेता निशांत कुमार, पै. देवा थापा यांच्या कुस्त्यांचा थरार पाहावयास मिळाले. तसेच वंदना ठाकूर इंदोर विश्व बाँडी बिल्डिंग विजेता २०२५ तसेच नित्या सिंग मॅरेथॉन विजेत्या उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!