भगवान महावीर यांच्या विश्वशांती व अहिंसेच्या मार्गाने जैन समाज वाटचाल करत आहे – आकाश बाफना जामखेडमध्ये भव्य मिरवणूकीसह विविध उपक्रमांनी महावीर जयंती साजरी

0
350

जामखेड न्युज—–

भगवान महावीर यांच्या विश्वशांती व अहिंसेच्या मार्गाने जैन समाज वाटचाल करत आहे – आकाश बाफना

जामखेडमध्ये भव्य मिरवणूकीसह विविध उपक्रमांनी महावीर जयंती साजरी

महावीर स्वामींच्या जीवनातील तत्त्वज्ञानाला “अहिंसा परमोधर्म” या वाक्याने ओळखले जाते. त्यांचे जीवन सत्य, अहिंसा,तपस्या, साधना आणि आत्मनियमनाचे आदर्श ठरले. महावीर यांनी सत्याचा मार्ग दाखवला आणि अहिंसा व समतेच्या विचारांचा प्रसार केला. त्यांचे जीवन आजही लाखो लोकांसाठी प्रेरणा आहे.

भगवान महावीर यांच्या विश्वशांती व अहिंसेच्या मार्गाने सकल जैन समाज वाटचाल करत आहे असे प्रसिद्ध उद्योगपती आकाश बाफना यांनी सांगितले.


जामखेड शहरात भगवान महावीर जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक सांस्कृतिक कार्यक्रम धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये पार पडले यावेळी संपूर्ण सकल जैन समाज, जैन श्रावक संघ उपस्थित होते.


मिरवणुकीत त्रिशलानंदन वीर की जय बोलो महावीर की, आज का दिन कैसा है सोने से भी महंगा है, वंदे वीर, ‘जय बोलो महावीर भगवान स्वामी की जय’ अशा घोषणांचा जयघोष करत मिरवणूक प्रमुख मार्गांनी मार्गक्रमण केले.

यावेळी बोलताना उद्योगपती आकाश बाफना म्हणाले की, आज संपूर्ण विश्वात भगवान महावीर जन्मोत्सव साजरा केला जात आहे. जैन श्रावक संघ व सकल जैन समाजाच्या वतीने भव्य दिव्य मिरवणूक व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

आज संपूर्ण जैन समाज भगवान महावीर यांच्या विश्वशांती, सत्य, अहिंसा या शिकवणुकीवर मार्गक्रमण करत आहे. सर्वाना महावीर जयंती निमित्त शुभेच्छा देण्यात आल्या. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here