श्री साकेश्वर यात्रा उत्सवानिमित्त भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान महाराष्ट्र केसरी सिंकदर शेख, राष्ट्रीय विजेता निशांत कुमार, पै. देवा थापा यांच्या कुस्त्यांचा थरार

0
1311

जामखेड न्युज——–

श्री साकेश्वर यात्रा उत्सवानिमित्त भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान

महाराष्ट्र केसरी सिंकदर शेख, राष्ट्रीय विजेता निशांत कुमार, पै. देवा थापा यांच्या कुस्त्यांचा थरार

परिसरातील नागरिकांना श्री साकेश्वर महाराज साकत ची यात्रा म्हणजे विविध कार्यक्रमाची खास मेजवानी असते. गावातील बाहेर गावी असलेले तसेच मित्र मंडळी व नातेवाईक आवर्जून दोन दिवस यात्रेसाठी येत असतात या वर्षी तीन दिवस यात्रा असणार आहे.

श्री साकेश्वर यात्रा उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार दि. १४ रोजी सकाळी ७.०० वा. कावड मिरवणूक व जल अभिषेक यात पारंपरिक बँड पथक, लेझीम पथक सहभागी असतात गुलालाची उधळण करत मोठ्या उत्साहात देवाला जल अभिषेक करण्यात येतो. सायंकाळी चार वाजता शेरणी वाटप कार्यक्रम नंतर सायंकाळी सात वाजता सांस्कृतिक कार्यक्रम असतात.

दि. १५ मंगळवारी सायंकाळी चार वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे भव्य दिव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात येते. यावर्षी प्रथम क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र केसरी पै. सिंकदर शेख विरूद्ध राष्ट्रीय विजेता पै. निशांत कुमार यांच्यात होईल या कुस्ती साठी इनाम ३,५०,०७०( तीन लाख पन्नास हजार सत्तर रूपये) व मानाची गदा कुस्ती सौजन्य अनिलजी वराट चेअरमन धारा गृप आँफ कंपनी इंदोर प्रमुख आकर्षण म्हणून वंदना ठाकूर इंदोर विश्व बाँडी बिल्डिंग विजेता २०२५ तसेच नित्या सिंग मॅरेथॉन विजेता याचबरोबर पै देवा थापा नेपाळ हे मुख्य आकर्षण असणार आहेत.

द्वितीय क्रमांकाच्या दोन कुस्त्या आहेत
सागर मोहळकर विरुद्ध मनिष रायते या कुस्ती साठी इनाम ७१०७० रूपये कुस्ती सौजन्य माजी कृषी अधिकारी सुरेश वराट, माजी सभापती डॉ. भगवानराव मुरूमकर व समाजकल्याण अधिकारी विनोद वराट तसेच पै समिर शेख विरुद्ध हनुमंत पुरी इनाम ७१०७० रूपये कुस्ती सौजन्य कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट व माजी सभापती संजय वराट, उपसरपंच राजाभाऊ वराट असतील.

तृतीय क्रमांकाची कुस्ती पै. संजय तनपुरे शुभम मगर ३१०७० रूपये कुस्ती सौजन्य नवनाथ बहिर, नारायण लहाने, श्रीराम घोडेस्वार तसेच पै. संदीप लटके विरुद्ध संदेश शिपुकले ३१०७० रूपये कुस्ती सौजन्य सुनील वराट, प्रमोद मुरूमकर, अजित वराट असे राहील. 

पै. सोरभ गाडे विरुद्ध विकास तावरे कुस्ती सौजन्य राम घोडेस्वार, पै. पृथ्वीराज वनवे विरुद्ध धुळाजी विरकर कुस्ती सौजन्य कै. हनुमंत पाटील यांच्या स्मरणार्थ ऋषीकेश पाटील, पै संकेत हजारे विरुद्ध पांडुरंग कावळे कुस्ती सौजन्य दशरथ तावरे, सागर मुरूमकर, पै भैय्या महाडिक विरुद्ध तुषार खामकर, पै अक्षय पाटील विरुद्ध पै. गणेश अडसूळ, पै. पवन गाडे विरुद्ध उमेश शिंदे कुस्ती सौजन्य पोलीस निरीक्षक महेश पाटील असतील

कुस्ती हगाम्यासाठी पंच म्हणून पै. बाळासाहेब आवारे, पै. बापू जरे, पै. शरद कार्ले, पै. बालाजी जरे, पै. श्रीधर मुळे, पै. विठ्ठल देवकाते, पै. वसंत रसाळ, पै. सचिन दाताळ, पै. आलेश जगदाळे, पै. भारत शिंदे, पै. मारूती गाडे, पै. मोहन पवार, पै. शकिल शेख, पै. मोहन अडसूळ, पै. सुरेश मुरूमकर, पै. डांबे मामा तर कुस्ती निवेदक म्हणून धनाजी मदने पंढरपूर
टिप नवीन कुस्त्या जोडल्या जाणार नाहीत, पंचाचा निर्णय अंतिम राहिल
स्थळ जिल्हा परिषद शाळा साकत, अधिक माहिती साठी संपर्क महादेव वराट पोलीस पाटील मो नं 9975698484
कै. वसंत (आण्णा) तुकाराम वराट यांच्या स्मरणार्थ शाळेस कुस्ती आखाडा बांधकाम भेट, जाहिरात सौजन्य राजस्थान ग्रेनाइट अँड टाईल्स हाऊस नायरा पेट्रोल पंप समोर बीड रोड जामखेड शहादेव वराट
तरी या भव्य दिव्य निकाली कुस्त्यांच्या जंगी मैदानाचा परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

या मैदानाचे मुख्य आकर्षण महाराष्ट्र केसरी सिंकदर शेख, राष्ट्रीय विजेता निशांत कुमार, पै. देवा थापा यांच्या कुस्त्यांचा थरार पाहावयास मिळणार आहे. तसेच वंदना ठाकूर इंदोर विश्व बाँडी बिल्डिंग विजेता २०२५ तसेच नित्या सिंग मॅरेथॉन विजेता उपस्थित राहणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here