उपमुख्यमंत्री अजित (दादा) पवार पुढील आठवड्यात जामखेडमध्ये
शिव, फुले, आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव
राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा कु. संध्या सोनवणे यांच्या संकल्पनेतून साजरी होत असलेल्याशिव, फुले, आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सवविविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे.१७ एप्रिलला साजऱ्या होत असलेल्या संयुक्त जयंती महोत्सवात गायनाच्या सुरेल महफिलीचेही आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून उपमुख्यमंत्री अजित (दादा) पवार असणार आहेत.
जामखेड महाविद्यालय येथे १७ एप्रिल २०२५ रोजी संध्याकाळी ६ वाजता शिव, फुले, आंबेडकर यांची संयुक्त जयंती महोत्सव राष्ट्रवादी युवती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कु. संध्या उद्धव सोनवणे यांच्या आयोजनाने साजरा करण्यात येणार असून गायनाची सुरेल मैफिलचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटक उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री अजितदादा पवार, कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधानपरिषद सदस्य शिवाजीराव गर्जे आदी प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती राहणार आहे.
या संयुक्त जयंती महोत्सवीला आनंद शिंदे यांचा “शिंदे शाही बाणा” व अभिजीत जाधव व अमु जाधव यांचा “शिवशंभो गर्जना” चा कार्यक्रम होणार आहे तरी या कार्यक्रमास उपस्थिती राहण्याचे आवाहन आयोजक राष्ट्रवादी युवती काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा संध्या सोनवणे यांनी केले आहे.
संध्या सोनवणे या जामखेड तालुक्यातील नायगाव ग्रामपंचायतच्या विद्यमान सदस्य तसेच वकील आहेत. एका सामान्य कुटुंबातील असलेल्या संध्या सोनवणे याआधी 2018 मध्ये फर्ग्युसन कॉलेजच्या जनरल सेक्रटरी म्हणून काम केले. विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांसाठी अनेक वेळा यशस्वी आंदोलने केली. खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी युवती संघटनेची स्थापना केल्यापासून सोनवणे संघटनेत सक्रिय होत्या. त्यानंतर 2018 साली संध्या सोनवणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून त्याच्या सामाजिक कार्याची दाखल घेत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांची राष्ट्रवादी युवती जिल्हाध्यक्ष म्हणून निवड केली होती.
शरद पवारांची साथ सोडली यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 2022 मध्ये सोनवणे यांची राष्ट्रवादी विधार्थी पुणे विभागीय अध्यक्ष म्हणून निवड केली, राष्ट्रवादी फुटीनंतर जामखेड तालुक्यातून सर्वात प्रथम संध्या सोनवणे यांनी शरद पवार गटाची सोडचिठ्ठी देत अजित पवार गटात प्रवेश करून चर्चेचा विषय बनल्या. अजित पवार गटात प्रवेश केल्यानंतरही त्यांनी पक्षांचे एकनिष्ठ होत, काम सुरू ठेवले. त्याची दाखल थेट अजित पवार यांनी युवती प्रदेशाध्यक्षपदी संध्या सोनवणे यांना संधी दिली.
चौकट कोणती घोषणा होणार?
रखडलेला जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्ग, तसेच रखडलेली उजणी पाणीपुरवठा योजना याबाबत अजित पवार काय भाष्य करणार याकडे जामखेड वासियांचे लक्ष लागले आहे. सध्या जामखेड करांना दहा दिवसातून एकदा पाणी मिळत आहे. तीव्र पाणी टंचाई चा सामना करावा लागत आहे.