रामनवमी व भाजप स्थापना दिन एकाच दिवशी हा योगायोग – सभापती प्रा. राम शिंदे
प्रेरणा दिवस म्हणून देशभरात साजरा
आज देशभरामध्ये रामनवमी साजरी केली जात आहे. योगायोग म्हणजे आज भाजपचा स्थापना दिवस देखील आहे. भाजप पक्षाने देशच नाही तर जगभरामध्ये आपली ओळख निर्माण केली आहे.पूर्वजांनी पाहिलेले सुशासनाचे स्वप्न भाजपा सरकारने पुर्ण केले आहे. अनेक वर्षाचे प्रलंबित प्रश्न सरकारने सोडवले काश्मीर प्रश्न, 370 वे कलम, पाचशे वर्षांचा राममंदिर प्रश्न असे कितीतरी प्रश्न सरकारने सोडवले आहेत. अनेक राज्यात व देशात एक मजबूत सरकार भाजपचेच आहे. आजचा दिवस प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे. आज रामनवमी व भाजप स्थापना दिन हा योगायोग आहे. असे सभापती प्रा राम शिंदे यांनी सांगितले.
भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त महाराष्ट्रात भाजपाने भव्य ऑनलाईन कार्यकर्ता संमेलनाचे आयोजन केले होते. यावेळी मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना आँनलाइन संबोधित करण्याच्या आगोदर कार्यकर्त्यांना संबोधीत करताना जामखेड येथे सभापती प्रा राम शिंदे बोलत होते. यावेळी प्रा. मधुकर राळेभात, तालुकाध्यक्ष अजय काशिद, संजय काशिद, अमित चिंतामणी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, माजी पंचायत समिती सभापती डॉ. भगवानराव मुरूमकर, आकाश बाफना, पोपट राळेभात, रवी सुरवसे, पवन राळेभात, बापुराव ढवळे, अंकुश ढवळे, सचिन घुमरे, कांतीलाल वराट, जाकीर शेख, मनोज कुलकर्णी, विष्णू भोंडवे, सुनील यादव, गौतम उतेकर, तुषार पवार, मनोज कुलकर्णी, ईश्वर मुरूमकर, नागराज मुरूमकर, प्रविण चोरडिया, अल्ताफ शेख, अजय सातव, पांडुरंग उबाळे,ज्ञानेश्वर झेंडे, अमित जाधव, सोमनाथ पाचारणे, बाजीराव गोपाळघरे, उद्धव हुलगुंडे, तुषार बोथरा, लहु शिंदे, शिवकुमार डोंगरे, अशोक बाफना यांच्या सह अनेक मान्यवर भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना सभापती प्रा राम शिंदे म्हणाले की, राज्यात व देशात स्थापना दिन उत्साहात साजरा केला जात आहे. ४५ वर्षाच्या आगोदरजनसंघ, नंतर जनता पक्ष आज भारतीय जनता पार्टी नावाने सर्वात मोठा पक्ष आहे. यासाठीपंडित दीनदयाळ, श्यामाप्रसाद मुखर्जी यांनीदेश संघटीत केला. अडचणीत पक्षाची ध्येय धोरणे टिकून ठेवली यामुळे आज पक्षाला चांगले दिवस आले आहेत.
कार्यकर्त्यांनी शासनाच्या विविध कल्याणकारी योजना वंचित घटकांपर्यंत कशा मिळतील या दृष्टीने प्रयत्न करा.
काम करणाराला न्याय देणारा पक्ष म्हणजे भाजप आहे. भारतीय जनता पक्षाची निर्मिती झाल्यानंतर अवघे दोन खासदार असलेल्या पक्षाने केवळ कार्यकर्त्यांच्या बळावर जगातील सर्वात मोठा पक्ष बनण्याची झेप घेतली. भाजप मध्ये कार्यकर्त्ते राष्ट्र प्रथम ही भावना ठेवून काम करतात.
या संमेलनात पक्षाच्या संघटनात्मक बळकटीवर चर्चा झाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आँनलाइन मार्गदर्शन केले. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्यकारी अध्यक्षरविंद्र चव्हाण, मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार यांनी मार्गदर्शन केले.