हभप कैलास महाराज भोरे जामखेड भुषण पुरस्काराने सन्मानित
महिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने पुरस्कार
हभप वैराग्य मूर्ती महाराज म्हणजे कैलास महाराज भोरे हे एक प्रसिद्ध कीर्तनकार आहेत, ते आपल्या मधुर आवाजाने आणि प्रभावी कथाशैलीने श्रोत्यांना नेहमीच मंत्रमुग्ध करतात. आपल्या कीर्तनातून पर्यावरण रक्षण, वृक्षारोपण, व्यसनमुक्ती, शिक्षणाचे महत्त्व पटवून देतात. परिसरात एक वैराग्य मुर्ती महाराज म्हणून ओळखले जातात जामखेड महिला आयोजित शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने हभप कैलास महाराज भोरे यांना जामखेड भुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
जामखेडमध्ये महिला आयोजित शिवजन्मोत्सव समिती मार्फत तीन दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबीर, सांस्कृतिक कार्यक्रम, भव्य दिव्य मिरवणूक, बाळ शिवाजी पाळणा, विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान, आदर्श माता सन्मान तसेच शिवकालीन शस्त्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.
परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला होता. तिथीनुसार शिवजयंती साजरी करत पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे हभप कैलास महाराज भोरे हे आळंदी देहू येथे होते त्यांना कार्यक्रमासाठी येणे झाले नव्हते म्हणून रामनवमी निमित्त तपनेश्वर येथील हनुमान मंदिरात त्याचे किर्तन होते. किर्तन सेवा संपल्यावर पुरस्कार वितरण करण्यात आले. यावेळी जगदंब प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय काशिद, केशवराज कोल्हे, सुरज काळे, माऊली अंदुरे, जामखेड मिडिया क्लबचे अध्यक्ष सुदाम वराट, पत्रकार धनराज पवार, कल्याण घायाळ, ज्ञानेश्वर अंदुरे, योगिता देशमुख, प्रताप वीर, डॉ. बांगर, गणेश मासाळ, ज्ञानेश्वर भोसले, किरण सोनवणे, संतोष लवांडे, सचिन देशमुख, राऊत सर, दादासाहेब महाराज सातपुते, संतोष राळेभात पाटील, सौ कल्याणी मासाळ यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
जामखेड मध्ये विविध पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
आदर्श माता विधानपरिषदेचे सभापती प्रा राम शिंदे यांच्या मातोश्री भामाबाई शिंदे व प्रसिद्ध उद्योगपती रमेश गुगळे, दिलीप गुगळे, संजय गुगळे यांच्या मातोश्री सदाबाई गुगळे यांना आदर्श माता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
जामखेड भुषण हभप कैलास महाराज भोरे
जामखेड गौरव प्रा. सुनील नरके, कै. सुरेश कुलथे,
जामखेड रत्न डॉ. शिवानी विष्णू पन्हाळकर, मयुर भोसले सर्पमित्र श्याम पंडित, शैक्षणिक रत्न मीना राळेभात याच बरोबर क्रीडा क्षेत्रात विविध पातळीवर नैपुण्य मिळवलेल्या २७ खेळाडूंना सन्मानित करण्यात आले.
महिला शिवजन्मोत्सव समिती च्या आयोजक रोहिणी काशिद यांच्या वतीने वरील पुरस्काराने वितरण करण्यात आले.
तीन दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भव्य रक्तदान घेण्यात आले यात सुमारे 134 रक्तदात्यांनी रक्तदान करून शिवरायांना अभिवादन केले. तसेच भव्य दिव्य महिलांची मिरवणूक, शिवरायांचा पाळणा, शिवकालीन शस्त्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. तसेच नाट्य स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.