जामखेड बस डेपो झाला धक्का स्टार्ट, जुन्या व निकृष्ट गाड्यामुळे मध्येच पडतात बंद जामखेड डेपोला नव्या बस मिळाव्यात

0
400

जामखेड न्युज——-

जामखेड बस डेपो झाला धक्का स्टार्ट,
जुन्या व निकृष्ट गाड्यामुळे मध्येच पडतात बंद

जामखेड डेपोला नव्या बस मिळाव्यात

एसटीला चांगले उत्पन्न मिळवून देणाऱ्या डेपोंपैकी एक असलेल्या जामखेड डेपोला सध्या समस्यांच्या विळख्यात सापडला आहे. कमी गाड्या, जुन्या गाड्या, नादुरुस्त गाड्या, दररोज अनेक ठिकाणी जामखेड डेपोच्या गाड्या बंद पडतात. अनेकांना बस ला धक्का देऊन चालू कराव्या लागतात यामुळे प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. जामखेड बस डेपो धक्का स्टार्ट झाला आहे असे प्रवाशी म्हणतात.

आज दि. ६ रोजी रामनवमी दिवशी जामखेड बस डेपोची गाडी करमाळा येथून जामखेड कडे येत असताना जामखेड शहरातील खर्डा चौकात गाडी बंद पडली यामुळे वाहतूक खोळंबा झाला होता. काही चालक वाहक व खर्डा चौकातील पोलीस चौकीतील होमगार्ड यांनी धक्का देऊन चालू करण्याचा प्रयत्न करत होते बराच वेळ कसरत चालू होती.

तीन जिल्ह्यांच्या सरहद्दीवर असलेल्या जामखेड तालुक्यातील एसटी डेपोमध्ये एकेकाळी एकूण ७० बस होत्या आता ५५ बस आहेत पण यातील काही बस कामासाठी लावलेल्या असतात यामुळे कमी बसवर आगार व्यवस्थापकाला तारेवरची कसरत करत नियोजन करावे लागते. यातच लांब पल्ल्याच्या तसेच ग्रामीण भागात जाणाऱ्या अनेक गाड्या बंद पडतात. यामुळे प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

अनेकांना लांबच्या प्रवासासाठी जायचे असते. आणि जर गाडी बंद पडली तर वेळेवर जाता येत नाही. तसेच अनेकांचे शासकीय कामे ठप्प होतात वेळेवर जाता येत नाही. तसेच महिला व मुलींना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो.


नादुरुस्त गाड्या मुळे अपघात होतात यात प्रामुख्याने चालकालाच जबाबदर धरले जाते; मात्र, डेपोतून बाहेर पडणाऱ्या गाडीची अवस्था ठीक नसेल तर चालकाचाही नाइलाज होतो. एसटीला चांगले उत्पन्न मिळवून देणाऱ्या डेपोपैकी जामखेड डेपो आहे. त्यामुळे याकडे एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

जामखेड आगारासाठी पाच नवीन बस मिळाल्या तसेच तारकपुर आकाराने काही दिवस वापरलेल्या पाच बस मिळाल्या एकुण दहा बस आल्या पण जुन्या सतत बंद पडत असलेल्या दहा बस स्क्रँब पाठवल्या यामुळे आहे तेवढ्याच बस राहिल्या. जामखेड डेपोसाठी जास्तीत जास्त बसची आवश्यकता आहे. लवकरात लवकर नवीन बस मिळाव्यात अशी मागणी होत आहे.

चौकट
प्रशासनात सुधारणा करण्याची मागणी
उपलब्ध बस वर योग्य नियोजन केले तर बस डेपो चांगले उत्पन्न मिळवून देऊ शकतो. यासाठी गाड्या वेळच्या वेळी दुरूस्ती करणे आवश्यक आहे. प्रशासनाने योग्य व नियमानुसार काम करणे आवश्यक आहे. चालक वाहक योग्य ड्युटी लावणे आवश्यक आहे. अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here