प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी यांचा पदग्रहण सभापती प्रा राम शिंदे यांच्या उपस्थितीत संपन्न सभापती प्रा राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी व अमित चिंतामणी यांनी राबविला सामाजिक उपक्रम

0
672

जामखेड न्युज——

प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी यांचा पदग्रहण सभापती प्रा राम शिंदे यांच्या उपस्थितीत संपन्न

सभापती प्रा राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी व अमित चिंतामणी यांनी राबविला सामाजिक उपक्रम

जनतेच्या विश्वासावर आधारित जबाबदार, पारदर्शक व विकासाभिमुख प्रशासनाचा संकल्प करत जामखेड नगरपरिषदेच्या नव-नियुक्त नगराध्यक्षा प्रांजल अमित चिंतामणी यांनी सभापती प्रा राम शिंदे यांच्या उपस्थित पदग्रहण सोहळा सन्मानपूर्वक व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

तसेच पदग्रहण स्विकारताच सभापती प्रा. राम शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नगराध्यक्ष सौ. प्रांजलताई चिंतामणी व मा. अमित चिंतामणी यांच्या पुढाकारातून गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना ब्लँकेट वाटप करण्यात आले.

या सामाजिक उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले. तसेच तात्याराम पोकळे यांची गटनेतेपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

या प्रसंगी श्री. धनंजय बांगर (तहसीलदार, जामखेड), श्री. अजय साळवे (मुख्याधिकारी, जामखेड नगरपरिषद), मा. प्रा. मधुकर (आबा) राळेभात, मा. शरद कार्ले (सभापती), संजय काशिद भाजपा अध्यक्ष शहर मंडळ, अमित चिंतामणी यांच्यासह सर्व नगरसेवक व नगरसेविका, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध व सकारात्मक वातावरणात पार पडत विकासाभिमुख प्रशासनाची नवी दिशा ठरवणारा ठरला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here