भाजपा गटनेते पदी तात्याराम पोकळे यांची निवड विविध क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव

0
833

जामखेड न्युज——

भाजपा गटनेते पदी तात्याराम पोकळे यांची निवड

विविध क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव

जामखेड नगरपरिषद निवडणूकीत सभापती प्रा राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने घवघवीत यश संपादन केले. पंधरा नगरसेवक व नगराध्यक्ष पदी भाजपाने विजय संपादन केला. सोमवार दि. २९ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात भाजपा गटनेते पदी नगरसेवक तात्याराम पोकळे यांची निवड करण्यात आली तशी नोंदणी करण्यात आली.

तात्याराम पोकळे हे शांत संयमी नेतृत्व २००९ पासून भाजपा व सभापती प्रा राम शिंदे यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून सर्व परिचित आहेत. समाजकारणातही ते अग्रेसर असतात. प्रभाग नऊ मधुन 396 मताधिक्याने विजय संपादन केला.

जामखेड नगरपरिषद निवडणूक निकालातून विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांचे निर्विवाद नेतृत्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. नगराध्यक्षपदासह 15 जागांवर विजय मिळवत भाजपाने केवळ सत्ता मिळवली नसून, विरोधकांच्या राजकीय ताकदीवरही प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी 3682 मोठ्या मताधिक्यांनी निवडून आल्याने भाजपने आपली ताकद दाखवली आहे. ही निवडणूक केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेपुरती मर्यादित न राहता प्रा. राम शिंदे विरुद्ध आमदार रोहित पवार अशी प्रतिष्ठेची लढाई बनली होती.

दोन्ही नेत्यांनी पूर्ण ताकद लावली असताना भाजपाने मिळवलेला स्पष्ट कौल हा संघटनात्मक मजबुती, कार्यकर्त्यांचे जाळे आणि प्रा. शिंदेंचा वैयक्तिक जनसंपर्क यांचा परिणाम मानला जात आहे.

तात्याराम पोकळे हे शिवशांती ग्रुपचे अध्यक्ष म्हणून सामाजिक कामात नेहमीच अग्रेसर असतात. २००९ पासून सक्रिय भाजपामध्ये काम करत आहेत. सभापती प्रा राम शिंदे यांचे विश्वासू म्हणून त्यांची ओळख आहे. तसेच शहर उपप्रमुख म्हणूनही आपल्या कामाचा ठसा उमटवला होता.

तात्याराम पोकळे यांच्या गटनेते पदी निवडीबद्दल सभापती प्रा राम शिंदे यांच्या सह मित्र मंडळी, नातेवाईक व भाजपा पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here