जामखेड कॅनरा बँकेत बनावट सोने तारण ठेवून १७ लाख ७३ हजारांची फसवणूक; गोल्ड व्हॅल्युअरसह चार अटकेत, चारही आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी
कॅनरा बँक जामखेड शाखेत तीन खातेदारांनी बनावट सोन्याचे दागिने तारण ठेवून तब्बल १७ लाख ७३ हजार रुपयांचे कर्ज घेऊन बँकेची फसवणूक केली होती. या प्रकरणी काल चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर तीन जणांना अटक केली होती. तर आज एका महिलेस अटक केली आहे या चारही जणांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार जणांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे
याप्रकरणी बँकेचे मॅनेजर आनंद डोळसे यांनी संबंधित चार जणांविरुद्ध जामखेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.त्यानुसार 4 आरोपींना पोलिसांनी अटक करून जामखेड न्यायालयात हजर केले असता त्यांना 5 दिवसांची पोलिस कस्टडी दिली आहे.
फिर्यादीनुसार, आरोपींनी गोल्ड व्हॅल्युअर (सोने तपासणी अधिकारी) याच्याशी संगनमत करून बनावट दागिने तारण ठेवले होते. हे प्रकरण १३ मार्च २०२५ रोजी कॅनरा बँकेच्या नाशिक येथील क्षेत्रीय कार्यालयातर्फे पाठविण्यात आलेल्या स्वतंत्र व्हॅल्युअरने तपासणी करताना उघडकीस आले.
फसवणूक करणाऱ्यांमध्ये मुन्वर अजीम खान पठाण (रा. नुराणी कॉलनी), अनिता संतोष जमदाडे (रा. बाजारतळ), व दिगांबर उत्तम आजबे (रा. आजबे वाडा, मेन रोड) यांचा समावेश आहे. तर गोल्ड व्हॅल्युअर आण्णासाहेब कोल्हे (रा. शिवम ज्वेलर्स, जामखेड) याच्यावर फसवणुकीत सहभागी असल्याचा आरोपी आहेत.
तपासणीत असे आढळले की, आरोपींनी एकूण ३९५.९ ग्रॅम वजनाचे बनावट दागिने खरे असल्याचे भासवून बँकेत तारण ठेवले होते. त्या बदल्यात संबंधित खातेदारांनी १७,७३,०००/- रुपयांची कर्जरक्कम घेतली होती. ही रक्कम त्यांच्या सेव्हिंग खात्यावर जमा करून नंतर त्यांनी काढून घेतली.
विशेष म्हणजे, यातील दोन कर्ज प्रकरणे बँकेच्या माजी मॅनेजर पूजा शर्मा आणि अधिकारी सुनील बारसे यांच्या कार्यकाळात मंजूर झाली होती, तर तिसरे प्रकरण सद्य मॅनेजर आनंद डोळसे यांच्या काळात झाले.
पुढील तपास पोलिस निरीक्षक महेश पाटील हे करत आहेत.
बँकेने दिलेल्या माहितीनुसार, तारण ठेवलेले बनावट दागिने पुढीलप्रमाणे आहेत:
या प्रकरणी बँकेने संबंधित खातेदार आणि गोल्ड व्हॅल्युअर यांच्या विरोधात फसवणूक, कट रचणे व विश्वासघात यांसारख्या गंभीर गुन्ह्यांसाठी तक्रार दाखल केली असून पुढील तपास जामखेड पोलिस निरीक्षक महेश पाटील करत आहेत. कॅनरा बँक शाखा, जामखेड येथे बनावट सोन्याचे दागिने तारण ठेवून घेतलेल्या कर्जाच्या प्रकरणात चार जणांना अटक करण्यात आली आहे. या फसवणुकीत एकूण १७.७३ लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे. चारही आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावणी आहे.