जामखेडमध्ये बनावट सोने ठेवून बँकेची 17 लाख 73 हजारांची फसवणूक गोल्ड व्हॅल्युअर सह चार जणांवर गुन्हा दाखल, तीन जण अटकेत

0
1870

जामखेड न्युज—–

जामखेडमध्ये बनावट सोने ठेवून बँकेची 17 लाख 73 हजारांची फसवणूक

गोल्ड व्हॅल्युअर सह चार जणांवर गुन्हा दाखल, तीन जण अटकेत

 

जामखेड मध्ये कॅनरा बँकेत बनावट सोने ठेवून बॅंकेची 17 लाख 73 हजाराची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी गोल्ड व्हॅल्युअर सह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

कॅनरा बॅंकेत खातेदारांनी तारण ठेवलेले सोन्याच्या दागिन्यांचे कॅनरा बँकेचे क्षेत्रिय कार्यालय (जि. नाशिक) यांचे मार्फतीने गोल्ड व्हॅल्युअर जगन्नाथ रामदार सोनार यांनी दिनांक 13 मार्च रोजी क्चॉलीटी तपासणी केली असता खातेदारांनी बँकेत तारण ठेवलेले सोन्याचे दागिने बनावट असल्याचे तपासणीत निष्पन्न झाले आहे. बनावट सोन्याचे दागिने ठेवुन रोख रक्कम कर्ज म्हणुन 17 लाख 73 हजार रुपयांची फसवणूक केली प्रकरणी जामखेड येथील गोल्ड व्हॅल्युअरसह चार जणांवर गुन्हा दाखल झाला आहे यामध्ये एका महिलेचा समावेश असून पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.

कॅनरा बॅंकेत खातेदारांनी तारण ठेवलेले सोन्याच्या दागिन्यांचे कॅनरा बँकेचे क्षेत्रिय कार्यालय (जि. नाशिक) यांचे मार्फतीने गोल्ड व्हॅल्युअर जगन्नाथ रामदार सोनार यांनी दिनांक 13 मार्च रोजी क्चॉलीटी तपासणी केली असता खातेदारांनी बँकेत तारण ठेवलेले सोन्याचे दागिने बनावट असल्याचे तपासणीत निष्पन्न झाले आहे. बनावट सोन्याचे दागिने ठेवुन रोख रक्कम कर्ज म्हणुन 17 लाख 73 हजार रुपयांची फसवणूक केली प्रकरणी जामखेड येथील गोल्ड व्हॅल्युअरसह चार जणांवर गुन्हा दाखल झाला आहे यामध्ये एका महिलेचा समावेश असून पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.

जामखेड पोलीसात आनंद बाबासाहेब डोळसे (वय-30 वर्षे, धंदा-नोकरी (कॅनरा बँक मॅनेजर जामखेड), रा. शिक्षक कॉलणी जामखेड यांनी फिर्याद दिली की, बँक शाखेत 03/09/2018 पासुन गोल्ड व्हॅल्युअर म्हणून आण्णासाहेब नामदेव कोल्हे (रा. शिवम ज्वेलर्स बीड कॉर्नर जामखेड जि. अहिल्यानगर) म्हणून कार्यरत आहेत.

कॅनरा बँक जामखेड शाखेतील खातेदार मुनावर अजीम खान पठाण (रा. नुराणी कॉलणी जामखेड जिल्हा अहिल्यानगर) यांनी दिनांक 21/10/2024 रोजी बँकेत येवुन त्यांना पैशाची गरज असल्याने त्यांनी बँकेत सोन्याच्या 4 नग बांगड्या वजन 60 ग्रॅम वजनाच्या व 4 नग सोन्याच्या अंगठ्या वजन 40 ग्रॅम असे एकूण 100 ग्रॅम सोने एकुण किंमत 5,84,375/- रु. कि.चे असे सोन्याचे दागिणे तारण ठेवुन त्यांनी बैंक शाखेतुन 4,55,000/- रु. मुनावर अजिम खान पठाण यांच्या कर्ज खाते बँकेने जमा केलेली रक्कम खातेदार यांनी काढुन घेतलेली आहे.

दूसरे खातेदार महिला अनिता संतोष जमदाडे (रा. बाजारतळ जामखेड जि. अहिल्यानगर) यांनी 23/10/2024 रोजी बँकेत येवुन त्यांनी आमचे बँकेत सोन्याच्या 2 नग बांगडया यजन 53.500 ग्रॅम च्या व 5 नग अंगठ्या वजन 98.700 ग्रॅम वजनाच्या एकूण वजन 152.200 ग्रॅम त्याची एकुण किंमत 8,61,055/- रु. चे असे सोन्याचे बनावट दागिने तारण ठेवुन त्यांनी बैंक शाखेतून 6,70,000/- रु. उचलले दिनांक 30/10/2024 रोजी बँक खातेदार दिगांबर उत्तम आजबे (रा. आजबे वाडा, मेन रोड, जामखेड जि. अहिल्यानगर) हा सोने तारण करण्यासाठी बँकेत येऊन 2 नग बांगड्या वजन 50 ग्रॅमच्या व 1 नग सोन्याचे कडे वजन 30 ग्रॅम तसेच 1 नग ब्रेसलेट वजन 48.200 ग्रॅमचे व 2 नग सोन्याच्या अंगठ्या वजन 15.200 ग्रॅम यांचे एकूण वजन 143.700/- यांची एकूण किंमत 8,53,014/- रु. कि.चे असे बनावट सोन्याचे दागिने तारण ठेवुन त्यांनी बँक शाखेतून 6,48,000/- रु. दिगांबर उत्तम आजबे यांनी उचलले कॅनरा बँकेचे क्षेत्रिय कार्यालय जि. नाशिक यांचे मार्फतीने गोल्ड व्हॅल्युअर म्हणुन श्री. जगन्नाथ रामदार सोनार यांनी दिनांक 13/03/2025 रोजी तारण ठेवलेल्या सोन्याचे दागिण्याची क्चॉलीटी तपासणी केली असता वरील खातेदार यांनी आमचे बँकेत तारण ठेवलेले सोन्याचे दागिने बनावट असल्याचे तपासणीत निष्पन्न झाले.


बॅंकेचा गोल्ड व्हॅल्युअर आण्णासाहेब कोल्हे, मुन्वर पठाण, डिगांबर आजबे व महिला अनिता जमदाडे यांनी संगनमत करून बॅंकेची 17 लाख 73 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. यातील महिला वगळता तीन आरोपींना अटक केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here