उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी शिवकार्याला साथ द्या – प्रा. कैलास माने
जामखेड मध्ये शिवकार्य सदस्य नोंदणी अभियानास प्रारंभ
शिवसेना प्रमुख व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी जामखेड तालुक्यातून जास्तीत जास्त शिवकार्य सदस्य नोंदणी करावी असे आवाहन शिवसेना तालुकाप्रमुख प्रा. कैलास माने यांनी केले.
आज जामखेड येथे शिवकार्य सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ झाला यावेळी ते बोलत होते. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख प्रा. कैलास माने, शिवसेना युवक तालुका उपप्रमुख नितीन कोल्हे, युवासेना तालुका प्रमुख अभिजीत माने, महिला आघाडी तालुकाप्रमुख वैशाली मुरूमकर, उपशहर प्रमुख शिवसेना अरुण तांबे, शहरप्रमुख देवीदास भादलकर, खर्डा शिवसेना शहर प्रमुख गहिनीनाथ जगताप, युवा नेते कपिल माने, अण्णासाहेब जाधव, योगेश पवार, पांडुरंग समुद्र, दादा घुगे, अरिफ शेख, बाळासाहेब साळवे, रोहित राजगुरू, कचरू पुलवळे व देवा जाधव सह अनेक शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जामखेड शहरातील शिवकार्य सदस्य नोंदणी अभियानास सुरवात झाली. या बाबत शिवकार्य सदस्य नोंदणीचा फॉर्म कसा भरावा तसेच जास्तीत जास्त फोकस ऑनलाईन सदस्य नोंदणीवर करायचा आहे.
महानगरपालिका नगरपालिका, पंचायत समिती व जिल्हा परिषद या निवडणुकीत यश मिळवण्यासाठी जास्तीत जास्त सदस्य नोंदणी अभियान करायचे आहे. कर्जत जामखेड मध्ये पंधरा हजार सदस्य नोंदणीचे टार्गेट आहे.
जामखेड तालुक्यात दहा हजार शिवकार्य सदस्य नोंदणी करण्याचे उद्दिष्ट आहे आणि निश्चितच आपण शिवसैनिकांच्या मदतीने ते पूर्ण करणार आहोत. व शिवसेना प्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करणार आहोत.